तुम्ही अनेकदा मिलिय, बिलियन, ट्रिलियन शब्द ऐकले असतील. एखाद्या व्यक्तीची संपत्ती असो किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्य असो....ही संख्या बिलियन किंवा ट्रिलियनमध्ये मोजली जाते. पण तुम्हाला मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनचा नेमका अर्थ माहितीये का? या आकड्यांमध्ये किती शून्य (0) लागतात आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? जाणून घेऊ...
आपण अनेकदा एकक, दशक, शतक, हजार, दसहजार, लाख, कोटी आणि दसकोटी, हे शब्द ऐकले आहेत. या शब्दांचा सामान्यांमध्ये सर्रासपणे वापर होतो. यापलीकडेही आकडे आहेत, पण त्याचा वापर क्वचितच पाहायला मिळतो.
अब्जाधीशांच्या संपत्ती आणि जीडीपी डेटा व्यतिरिक्त, सोशल मीडियाच्या युगात व्हायरल होणार्या व्हिडिओ आणि फोटोंसाठी मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन शब्द वापरले जातात. एखादा व्हिडिओ इतक्या मिलियन लोकांनी पाहिला किंवा लाईक केला. आता सोप्या भाषेत समजून घेऊ या आकड्यांचा अर्थ.
मिलियनचा अर्थ
व्हिडिओच्या व्ह्यूज किंवा लाइक्सच्या आधारे समजायचे झाल्यास, जर एखाद्या व्हिडिओला 1 मिलियन लाइक्स मिळाले असतील, तर याचा अर्थ 10 लाख लाईक्स मिळाले आहेत. 1 मिलियनमध्ये 1 च्या पुढे सहा शून्य असतात.
- 1 दशलक्ष = 1000000
- 5 दशलक्ष = 5000000
बिलियनचा अर्थ
1 बिलियन म्हणजे एक अब्ज. श्रीमंतांच्या संपत्तीच्या आधारे पाहिल्यास, एखाद्या व्यक्तीची एकूण संपत्ती 5 बिलियन असेल, तर तो 5 अब्ज रुपयांचा मालक आहे. एक बिलियनमध्ये 100 कोटी रुपये असतात. भारताची लोकसंख्या पाहिली तर ती सुमारे 1.4 बिलियन म्हणजेच 140 कोटी आहे. या आकड्यात 1 च्या पुढे 9 शून्य असतात.
- 1 अब्ज = 1,000,000,000
- 5 अब्ज = 5,000,000,000
ट्रिलियनचा अर्थ
ट्रिलियनबद्दल बोलायचे झाल्यास, हा आकडा सहसा देशाची अर्थव्यवस्था सांगण्यासाठी वापरला जातो. भारताची चीनची किंवा अमेरिकेची अर्थव्यवस्था इतक्या ट्रिलियन डॉलर्सची होईल, असे म्हटले जाते. 1 ट्रिलियन म्हणजे 10 अब्ज. हे जगातील सर्वात मोठे युनिट देखील मानले जाते. यात 1 च्या पुढे 12 शून्य असतात.
- 1 ट्रिलियन = 10,00,00,00,00,000
- 5 ट्रिलियन = 50,00,00,00,00,000