Salary Calculator: तुम्ही जॉब बदलत असाल किंवा नवीन जॉब जॉईन करत असाल, तर सॅलरीचं कॅलक्युलेश समजून घेणं हे सर्वात कठीण काम असतं. खाजगी नोकऱ्यांमध्ये, कंपन्या बर्याचदा मंथली सीटीसी (Monthly CTC), व्हेरिएबल (variable), डिडक्शन्स (Deductions), टेक होम सॅलरी (Take Home Salary) यावर वेगवेगळे फॉर्म्युले लागू करतात. तुम्हाला तुमचं मूळ वेतन किती असेल, मंथली सीटीसी किती असेल, हातातील पगार किती असेल हे पहावं लागेल. जर तुमचा पगार तुमच्यासाठीही एक कोडं बनला असेल तर इथे तुम्ही त्याचं उत्तर जाणून घेऊ शकता.सॅलरी समजून घ्यातुमच्या पगाराचे दोन भाग असतात - पहिल्या भागात तुमचं अर्निंग असतं म्हणजेच तुमच्याकडे येणारा पैसा. दुसरा भाग म्हणजे वजावट, म्हणजेच तुमच्या पगारातून कापले जाणारे पैसे. कमाईमध्ये तुमचा मूळ पगार, घरभाडे भत्ता (HRA), विशेष/किंवा इतर भत्ते, परफॉर्मन्स बोनस, रिअंबर्समेंट आणि व्हेरिएबल पे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. वजावटीच्या भागामध्ये ग्रॅच्युइटी, तुमची कंपनी आणि कर्मचार्यांचं भविष्य निर्वाह निधीसाठीचे योगदान आणि प्रोफेशनल टॅक्स यांचा समावेश होतो. आता, जेव्हा सॅलरी स्ट्रक्चर बऱ्याच माहितींसह येतं, तेव्हा तुमचा गोंधळ होऊ शकतो. त्याशिवाय, इनहँड सॅलरी काय असेल हे समजणं देखील थोडे गोंधळात टाकणारं होऊ शकतं.
सॅलरी कॅलक्युलेटरचा वापरइन हँड सॅलरीचं कॅलक्युलेश करण्यासाठी, तुम्ही सहजपणे सॅलरी कॅल्क्युलेटर किंवा टेक होम सॅलरी कॅल्क्युलेटर वापरू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमचं वार्षिक CTC त्या ठिकाणी टाकवं लागेल.
- आता व्हेरिएबल जसं की बोनसची रक्कम वगैरे टाका.
- आता तुमची बेसिक सॅलरी टाका.
- कॅलक्युलेशन केल्यानंतर, तुमची टेक-होम सॅलरी समजेल.
- जर तुम्हाला प्रत्यक्ष इन-हँड पगाराचं कॅलक्युलेशन करायचं असेल, तर तुम्ही तुमचा HRA, रेंट, ग्रॅच्युइटी, EPF आणि इतर भत्ते यांचं कॅलक्युलेशन करू शकता आणि इन हँड सॅलरी मोजू शकता.
८ लाखांच्या CTC वर तुम्हाला किती पगार मिळेल?जर तुमचा सीटीसी ८ लाख आहे, व्हेरिएबल ८० हजार रुपये आहे आणि बेसिक पे टोटल CTC च्या ५० टक्के म्हणजे ४ लाख रुपये आहे असं गृहीत धरू. तर तुमची ग्रॉस सॅलरी ५७,२०० रुपये असेल. मंथली CTC रुपये ६६,६६६ रुपये असेल. टॅक्स ६५७ रुपये आणि इन हँड सॅलरी ५५,५४२ रुपये असेल.