Join us  

पुण्यात हक्काचं घर हवं; कसा करायचा म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज? काय आहे पात्रता?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 3:59 PM

Mhada Lottery २०२४ : पुण्यात हक्काचं घर विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाच्या अनेक सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे.

Mhada Lottery २०२४ : तुम्हाला पुण्यात तुमच्या हक्काचं स्वस्तात घर घ्यायचं असेल तर सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबईनंतर आता पुण्यात म्हाडातर्फे विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजतापासून सुरू झाली आहे. त्यामुळे म्हाडासाठी अर्ज कसा भरायचा, त्यासाठी वयोमर्यादा काय, अर्ज भरताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, याबाबत आपण जाणून घेऊयात.

अर्जदारासाठी पात्रता काय?

  • म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. 
  • म्हाडामध्ये तुमच्या वार्षिक उत्पनानुसार विविध श्रेणीतील घरांसाठी अर्ज करता येतो. अर्जदाराचे मासिक उत्पन्न २५,००१ ते ५०,००० रुपयांपर्यंत असेल तर ती व्यक्ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतो.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न ५०,००१ ते ७५,००० च्या दरम्यान असेल त्यांना मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकांसाठी अर्ज करता येईल.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न ७५,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उच्च उत्पन्न गट  (एचआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतात.
  • जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न रुपये 50,001 ते 75,000 रुपये दरम्यान असेल, तर तो/ती मध्यम उत्पन्न गट (MIG) फ्लॅटसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास उच्च उत्पन्न गट (HIG) फ्लॅटसाठी देखील अर्ज करू शकतात.

अर्ज कसा भरायचा?ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. यासाठी ‘रजिस्टर’ या पर्याया वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील. युजरनेम नाव निवडा आणि पासवर्ड तयार करुन दिलेल्या जागेवर भरा. पुढे दिलेली तुमची सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. सबमीटच्या आधी तुम्हाला तेथे तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरण्यात येईल.

म्हाडाचे आवाहनम्हाडाचे घर मिळवून देतो म्हणून यापूर्वी देखील अनेकांची फसवणूक झाली आहे. काहींनी तर म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करुन अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने घरखरेदीदारांना आवाहन केलंय. सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नयेत असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे. 

टॅग्स :म्हाडागुंतवणूकसुंदर गृहनियोजन