चंद्रकांत दडस, उपसंपादक, मुंबई
सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक टेलिग्रामसारख्या सोशल मीडियावरून फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आमच्या व्हॉट्सॲप/टेलिग्राम ग्रुपमध्ये या आणि येथे तुम्हाला उत्तम कंपन्यांचे स्टॉक सांगू. त्यातून तुम्ही दुप्पट पैसे कमावू शकता असे आमिष दाखवून लोकांना फसविले जात आहे. आपल्यालाही असा सल्ला देणाऱ्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले असेल तर काळजी घ्या. आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ...
चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या
जर तुम्हाला एखादे गुंतवणूकॲप डाउनलोड करायचे असल्यास प्रथम त्या ॲपबद्दल रिव्ह्यू वाचा. थोडा अभ्यास करा. ही गुंतवणूकदारांची थोडी तरी जबाबदारी राहतेच. डोळे झाकून केलेली गुंतवणूक अतिशय धोकादायक असते हे लक्षात घ्या.
मोडस ऑपरेंडी काय?
- तुम्हाला गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचा फोन केला जातो त्यानंतर तुम्हाला त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले जाते.
- आम्ही सांगितलेल्या कंपन्यांनी पाहा कसे प्रचंड रिटर्न दिले आहेत हे दाखविण्यासाठी बनावट स्क्रिनशॉट दाखविले जातात. तुम्हाला बनावट ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितले जाते.
- तुम्हाला तत्काळ श्रीमंत करण्याचे आमिष दाखविले जाते. यात तुम्हाला भावनिक करून पैसे उकळले जातात.
काय आमिषे दाखविली जातात?
- आयपीओतून बंपर नफा देऊ.
- प्रचंड प्रमाणात या कंपन्याचे शेअर्स वाढतील
- कमी वेळेत प्रचंड रिटर्न देणाऱ्या स्किम
- १ लाख रुपये गुंतवल्यास ६ महिन्यांत/वर्षात दुप्पट