खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक ग्रोथसाठी वेळोवेळी नोकऱ्या बदलत असतात. नोकरी बदलल्यानंतर, नवीन EPF खाते देखील उघडले जाते. परंतु ही खाती एकत्र मर्ज केली तरच तुमच्या नोकरीच्या कालावधीचे संपूर्ण पैसे एकाच खात्यात एकत्र दिसतील. पण अनेक वेळा लोकांना याची माहिती नसते. त्यांना वाटतं की जर UAN क्रमांक एक असेल तर EPF खातंदेखील एकच असेल. या गैरसमजात एका युएएनअंतर्गत अनेक ईपीएफ खाती तयार होतात.
तुमचाही आत्तापर्यंत हा गैरसमज होता, तर आता तो विचार डोक्यातून काढून टाका आणि इतर ईपीएफ खात्यांमधून पैसे एकाच खात्यात ट्रान्सफर करा. हे करणं अवघड काम नाही, ईपीएफओ खात्यातून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील देते, अशा परिस्थितीत तुम्ही हे काम घरी बसून करू शकता. त्याची प्रक्रिया आपण जाणून घेऊया.
कसं करता येईल ऑनलाइन ट्रान्सफर?
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटवर जावं लागेल.
- युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर येथे लॉग इन करा.
- साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यावर ऑनलाइन सर्व्हिसेस (Online Services) असं लिहिलेलं असेल. यावर क्लिक करा.
- यामध्ये One Member One EPF Account (Transfer Request) च्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर, तुमच्या समोर जे पेज उघडेल, त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती दिली जाईल. ती तपासून पाहा.
- ज्यातून तुम्हाला दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, त्याचा पीएफ खातं क्रमांक निवडावा लागेल.
- यानंतर Get OTP बटणावर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
- OTP मिळाल्यानंतर, तो एन्टर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
- ओटीपी एन्टर केल्यानंतर, ऑनलाइन पैसे ट्रान्सफर प्रक्रियेची विनंती तुमच्या कंपनीला पाठविली जाईल.
- त्यानंतर ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. प्रथम कंपनी ते ट्रान्सफर करेल. त्यानंतर ईपीएफओचे फिल्ड ऑफिसर त्याची पडताळणी करतील.
- त्यानंतर तुम्हाला जुन्या आणि नवीन नोकरीच्या तपशीलासह फॉर्म १३ भरावा लागेल. पीडीएफ स्वरूपात भरलेल्या फॉर्मची प्रिंट आउट घ्या. स्वाक्षरी करून अटेस्ट करा.
- यानंतर, ज्या कंपनीच्या पीएफ खात्यात तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या कंपनीकडे फॉर्म सबमिट करा.
- कंपनी किंवा संस्था तुमची EPF ट्रान्सफरची विनंती डिजिटल पद्धतीनं मंजूर करते. यानंतर, पूर्वीचे ईपीएफचे पैसे सध्याच्या कंपनीच्या नवीन ईपीएफ खात्यात ट्रान्सफर केले जातात.
- ट्रान्सफरची विनंती पूर्ण झाली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही ट्रॅक क्लेम स्टेटसमध्ये (Track Claim Status) ट्रॅक करू शकता.