How to withdraw money from PF : आपल्या भविष्यासाठी आणि अडचणीच्या काळात पीएफ फंड हे देवदुतासारखं काम करतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड निवृत्तीनंतरचा खर्च भागवण्यासाठी तयार केला जातो. त्यामुळे त्यातून पैसे काढू नयेत, असा सल्ला दिला जातो. अनेक EPFO सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतात. मात्र, प्रोसेस माहित नसल्यामुळे गरज असूनही काढता येत नाही. पीएफ फंड काढण्याची प्रक्रिया जाणून घेण्यापूर्वी पीएफचे पैसे कधी काढू शकता? हे माहित असणे आवश्यक आहे.
EPFO सदस्य त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या पीएफ फंडातून आंशिक किंवा पूर्ण रक्कम काढू शकतात. साधारणपणे, सदस्य 2 महिने किंवा त्याहून अधिक काळ बेरोजगार असेल तरच संपूर्ण EPF रक्कम काढता येते. याशिवाय, तुम्ही निवृत्तीनंतर तुमच्या पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकता.
या परिस्थिती काढू शकता पीएफ फंड
- स्वतःचे किंवा मुलाचे लग्न
- वैद्यकीय गरज
- घर खरेदी करण्यासाठी
- गृहकर्ज फेडण्यासाठी
- घराचे नूतनीकरण करण्यासाठी
- वरील कारणासाठी आंशिक पैसे काढण्यासाठी, EPFO सदस्य किमान 5 किंवा 7 वर्षांसाठी EPF सदस्य असणे आवश्यक आहे.
पीएफमधील पैसे काढण्याची प्रक्रिया
- पीएफ फंड काढण्यासाठी तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), बँक खाते क्रमांक, आयडी प्रूफ आणि रद्द केलेला चेक असणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम UAN पोर्टलवर जाऊन तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल.
- तुम्हाला आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल. हा ओटीपी आणि कॅप्चा टाका.
- यानंतर तुमचे प्रोफाइल पेज उघडेल. वेबपेजच्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला "ऑनलाइन सेवा" हा पर्याय दिसेल. यात स्क्रोल डाउन ऑप्शन्समधून 'क्लेम' वर क्लिक करा.
- इथे तुम्हाला ईपीएफओशी जोडलेला बँक खाते क्रमांक टाकून सदस्याचे डिटेल्स व्हेरीफाय करावे लागतील.
- त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग मिळेल, ज्यामध्ये दावा केलेली रक्कम EPFO द्वारे या बँक खात्यात जमा केली जाईल. आता नियम आणि अटींवर 'होय' वर क्लिक करावे लागेल.
- ऑनलाइन क्लेमसाठी पुढे जाऊ शकता. तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, एक सेक्शन ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला अधिक तपशील नोंदवावे लागतील.
- यामध्ये तुमचा पत्ता आणि स्कॅन केलेला चेक आणि फॉर्म 15G सारखे काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील.
- अशा प्रकारे, ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यासाठी क्लेम सबमिट केला जाईल.