खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या स्कीमला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना सुरू होऊन सहा महिनेही झाले नाहीत आणि यामध्ये 9600 कोटींहून अधिक गुंतवणूक आली आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू झाली. या बचत योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती.
सध्या मिळतंय 7.5% व्याजसध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते. या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जर एखाद्या महिलेला दोन योजना सुरू करायच्या असतील तर किमान 3 महिन्यांचे अंतर आवश्यक आहे.
ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. यामध्ये व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ आधारावर केली जाते. योजनेच्या शेवटी एकूण व्याज दिलं जातं. खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.
प्री क्लोजरबाबत काय नियम?प्री-मॅच्युअर क्लोजरबाबत काही अटी आहेत. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पालकाचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केलं जाऊ शकतं.