Join us

जगभरात अब्जाधीशांची संख्या कमी झाली; भारतात 16 अब्जाधीश वाढले, रेखा झुनझुनवाला टॉपवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 5:48 PM

सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्यांच्या यादीत जेफ बेजोस एक तर गौतम अदानी दुसऱ्या नंबरवर आहेत.

Hurun Global Rich List: गेल्या काही दिवसांपासून जागतिक अर्थव्यवस्थेत उलथापालथ पाहायला मिळत आहे. यामुळे अब्जाधीशांच्या संख्येतही घट झाली आहे. पण भारतावर त्याचा फार परिणाम झालेला नाही. उलट या काळात भारतातील अब्जाधीशांची झपाट्याने वाढली आहे. Hurun Global Rich List मधून ही माहिती  समोर आली आहे. भारतातील नव्या अब्जाधीशांमध्ये शेअर बाजाराती बिगबुल दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या आघाडीवर आहेत.

भारतात अब्जाधीश वाढलेहुरुनच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये जगातील एकूण अब्जाधीशांची संख्या 3,384 होती, जी 2023 मध्ये 3,112 वर आली आहे. तुम्ही नवीन अब्जाधीशांची यादी पाहिली तर 2023 मध्ये जगातील 99 शहरांमध्ये 176 नवीन अब्जाधीश झाले आहेत. आपण भारताबद्दल बोललो तर देशात एकूण 187 अब्जाधीश राहतात, तर भारतीय वंशाच्या अब्जाधीशांची संख्या 217 आहे. हा आकडा अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे. ज्यांची संपत्ती 8,000 कोटींहून अधिक आहे, अशा श्रीमंतांचाच या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

रेखा झुनझुनवाला आघाडीवरबिगबुल राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला त्यांचा व्यवसाय हाताळत आहेत आणि तो यशस्वीरित्या पुढे नेत आहेत. हुरुनच्या नवीन भारतीय अब्जाधीशांच्या यादीत त्यांना पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. म्हणजेच नव्याने सामील झालेल्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांची संपत्ती सर्वाधिक आहे.

भारतीयांची कमाई हाँगकाँगच्या जीडीपीएवढीकमाईच्या बाबतीतही भारतीय अब्जाधीशांचा जगावर दबदबा कायम आहे. या वर्षात गौतम अदानी आणि इतरांच्या संपत्तीत मोठी घट झाली असली, तरी गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, भारतीय श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. हुरुनच्या मते, भारतातील सर्व अब्जाधीशांनी पाच वर्षांत एकूण 360 अब्ज डॉलर्स, म्हणजेच सुमारे 30 लाख कोटी रुपये कमावले आहेत. हा आकडा हाँगकाँगच्या जीडीपीच्या जवळपास आहे.

संपत्ती गमावण्यात बेझोस-अदानी आघाडीवरहुरुनच्या अहवालानुसार, सर्वाधिक संपत्ती गमावलेल्या अब्जाधीशांमध्ये अॅमेझॉनचे जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर आहेत, तर भारतीय अब्जाधीश गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बेझोस यांच्या संपत्तीत यावर्षी 70 अब्ज डॉलरची घट झाली आहे. दुसरीकडे, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 28 अब्ज डॉलरने घटून $53 अब्ज झाली आहे. 

टॅग्स :राकेश झुनझुनवालाव्यवसायशेअर बाजारशेअर बाजार