Hurun's Top Philanthropists in India 2024 : काही दिवसांपूर्वीच दिग्गज भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. टाटांच्या मृत्यूपत्रानुसार, त्यांनी आपली 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्ती किमतीच्या संपत्तीचा मोठा भाग दान केला आहे. विशेष म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीदेखील रिलायन्स फाउंडेशनद्वारे मोठ-मोठ्या देणग्या देतात. पण, तुम्हाला माहीतेय का? देशातील सर्वाधिक दान करण्यामध्ये टाटा किंवा अंबानी यांचे नाव आघाडीवर नाही.
या व्यावसायिकाने सर्वाधिक संपत्ती दान केली
श्रीमंत लोकांची यादी बनवणारी संस्था हुरुन इंडियाने भारतातील सर्वाधिक दान करणाऱ्या व्यक्तींची यादी जारी केली आहे. हुरुन इंडिया टॉप 10 फिलान्थ्रोपिस्ट इन इंडिया 2024 यादीनुसार, देशातील सर्वाधिक संपत्ती दान करणाऱ्यांमध्ये टॉवर शिव नाडर आहेत. गेल्या वर्षीही तो या यादीत अव्वल होते. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने यावर्षी 2,153 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
या यादीत शिव नाडरनंतर मुकेश अंबानी आणि कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी कल्याणकारी कामांसाठी 407 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर, बजाज परिवाराने या यादीत मोठी झेप घेतली असून, सहाव्या ऐवजी तिसरे स्थान पटकावले आहे. बजाज कुटुंबाने यावर्षी 352 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
या व्यावसायिकांचा टॉप-10 मध्ये समावेश
हुरुन इंडियाच्या या यादीत टॉप-10 मध्ये अनेक उद्योगपतींची नावे आहेत. कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब 334 कोटी रुपयांची देणगी देऊन यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर गौतम अदानी 330 कोटी रुपयांच्या देणगीसह पाचव्या स्थानावर आहेत.
या यादीत नंदन नीलेकणी सहाव्या (रु. 307 कोटी देणगी), कृष्णा चिवुकुला सातव्या (रु. 228 कोटी देणगी), अनिल अग्रवाल आठव्या (रु. 181 कोटी देणगी), सुष्मिता आणि सुब्रतो बागची नवव्या (रु. 179 कोटी देणगी) आणि रोहानी नीलेकणी दहाव्या (रु. 154 कोटी देणगी) स्थानावर आहेत. आशा फाउंडेशनच्या कृष्णा चिवुकुला आणि माइंडट्रीच्या सुष्मिता आणि सुब्रतो बागची यांनी पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवले आहे.
दान केलेला पैसा कुठे खर्च होतो?
देशातील टॉप 10 उद्योगपतींनी एकूण 4,625 कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे. टॉप-10 पैकी सहा जणांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांद्वारे देशातील शिक्षण सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.