Lokmat Money >गुंतवणूक > ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज

ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज

व्याजदरात केलेल्या या वाढीनंतर, बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50% ते 6.75% व्याज देईल. तसेच, 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.15% व्याज देईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 07:27 PM2023-01-07T19:27:00+5:302023-01-07T19:28:20+5:30

व्याजदरात केलेल्या या वाढीनंतर, बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50% ते 6.75% व्याज देईल. तसेच, 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.15% व्याज देईल.

ICICI Bank gave good news to customers, now 7.15% interest will be available on FD | ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज

ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज

खाजगी क्षेत्रातील नामांकित ICICI बँकेने आपल्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुयांपर्यंतच्या एफडीला बल्क एफडी म्हटले जाते. व्याजदरात केलेल्या या वाढीनंतर, बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50% ते 6.75% व्याज देईल. तसेच, 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.15% व्याज देईल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, वाढलेले नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच 7 जानेवारीपासून लागू होत आहेत.

आयसीआयसीआय बँकेचे वाढलेले व्याजदर असे - 
व्याजदरातील वाढीनंतर बँक 7 दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 4.50 टक्के, 30 वस ते 45 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के, 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 5.50 टक्के, 60 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के, 91 ते 184 दिवसांच्या एफडीवर 6.25 टक्के आणि 185 दिवस ते 270 दिवसाच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज देईल. 

या बरोबर, बँक 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमीच्या एफडीवर 6.65 टक्के, 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या एफडीवर 7.10 टक्के, 15 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.15 टक्के, 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7 टक्के आणि 3 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज देईल.

येथे मिळत आहे 7.50 टक्के व्याज -
तत्पूर्वी, ICICI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती. या व्याजदर वाढीनंतर, बँकेच्या सर्वसामान्य ग्राहकांना 15 महिने ते 5 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक ७ टक्के, तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50 टक्के व्याज मिळत आहे. बँकेचे वाढलेले नवीन व्याजदर 16 डिसेंबरपासून लागू आहेत.

Web Title: ICICI Bank gave good news to customers, now 7.15% interest will be available on FD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.