Lokmat Money >गुंतवणूक > महिन्याला ५० हजार सॅलरी असेल तर किती बचत करायला हवी?; समजून घ्या गणित

महिन्याला ५० हजार सॅलरी असेल तर किती बचत करायला हवी?; समजून घ्या गणित

सॅलरी वाढल्यावर बचतीचा विचार करू. ते कधीही पैसे वाचवू शकत नाहीत कारण सॅलरी वाढण्याची अपेक्षा कधी संपत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 07:05 PM2022-11-18T19:05:53+5:302022-11-18T19:06:57+5:30

सॅलरी वाढल्यावर बचतीचा विचार करू. ते कधीही पैसे वाचवू शकत नाहीत कारण सॅलरी वाढण्याची अपेक्षा कधी संपत नाही.

If you have a monthly salary of 50,000, how much should you save?; Know About Saving | महिन्याला ५० हजार सॅलरी असेल तर किती बचत करायला हवी?; समजून घ्या गणित

महिन्याला ५० हजार सॅलरी असेल तर किती बचत करायला हवी?; समजून घ्या गणित

कमाई आहे पण बचत होत नाही. महिन्याकाठी पैसे शिल्लकच राहत नाहीत अधिकाधिक नोकरी करणाऱ्यांची ही समस्या आहे. मग स्वत:ला दिलासा देण्यासाठी म्हणतात, जेव्हा सॅलरी वाढेल तेव्हा काही पैसे बचत करू. पण असे कधीच होत नाही. जेणेकरून भविष्यात तुम्हाला पैसे कामाला येतील. तुमचीही बचत होत नाही. तुम्हालाही ही समस्या जाणवतेय का?

जे म्हणतात, सॅलरी वाढल्यावर बचतीचा विचार करू. ते कधीही पैसे वाचवू शकत नाहीत कारण सॅलरी वाढण्याची अपेक्षा कधी संपत नाही. जर तुम्हाला आहे त्या पगारात बचत करायची असेल तर त्यासाठी इच्छाशक्ती आणि उत्तम प्लॅनिंगची गरज आहे. चला, आज आम्ही तुम्हाला बचत कशी आणि किती करायची याबाबत काही टिप्स देत आहोत. 

२० हजार पगार असणारेही बचत करू शकतात
जर तुमचा पगार २० हजार महिना असेल तर त्यातही बचत होऊ शकते. फॉर्म्युला असा की सॅलरी आल्यानंतर सर्वात आधी बचतीचा काही भाग दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा. जर दुसरं अकाऊंट नसेल तर बचतीसाठी जे पैसे ठरवलेत त्याला हात लागणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर महिन्याला पगाराच्या १० टक्के भाग शिल्लक ठेवा. म्हणजे सुरुवातीला ६ महिन्यापर्यंत केवळ २ हजार रुपये वाचवा. 

आजच्या काळात अनेकांना ५० हजारांपर्यंत पगार मिळतो. जर तुम्हालाही महिन्याला ५० हजाराच्या आसपास पगार असेल तर आम्ही तुम्हाला गणित सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिन्याला कसे आणि किती बचत करू शकाल, त्याची गुंतवणूक कुठे करायची जेणेकरून भविष्यात तुम्हाला मोठी रक्कम हाती लागेल आणि संकटात कामाला येईल.  जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला दोन मुले असतील. तरीही तुम्ही तुमच्या ५०००० पगारातून बचत करू शकता. सर्वसाधारणपणे, पगारदार लोकांनी, विशेषत: खासगी नोकरी करणाऱ्यांनी दरमहा त्यांच्या पगारातील सुमारे ३० टक्के बचत केली पाहिजे. म्हणजेच दरमहा १५ हजार रुपये वाचले पाहिजेत, असा नियम आहे. जर तुमचा पगार ५० हजार असेल आणि तुम्ही त्यात दर महिन्याला १५ हजार रुपये वाचवत नसाल, तर तुम्ही गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठू शकणार नाही, याचा तुम्ही लगेच विचार करायला हवा.

१० टक्के बचतीपासून सुरुवात करा
जर तुम्ही बचत करायला सुरुवात करत असाल, तर १०% ने सुरुवात करा, परंतु तुम्ही ३०% बचत होईपर्यंत ते दर ६ महिन्यांनी ते प्रमाण वाढवत रहा. सुरुवातीला तुम्हाला खूप समस्यांना सामोरे जावे लागेल, खर्च भागणार नाही कारण संपूर्ण पगार खर्च करण्याची सवय आधीच लागली आहे. पण ६ महिन्यात तुम्ही तुमची सवय बदलू शकता. प्रथम खर्चाची यादी तयार करा. त्यामध्ये जे आवश्यक आहे त्यांना प्राधान्य द्या. नंतर जे वाचणं शक्य आहे याचा विचार करा. जर महिन्यातून ४ वेळा बाहेर खाण्याची सवय असेल तर महिन्यातून २ वेळा करा. याशिवाय अनावश्यक खर्चांची यादी बनवा, जे तुम्ही दर महिन्याला अनावश्यकपणे खर्च करता, प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील १०% अनावश्यक खर्च करतो.

योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक 
अशाप्रकारे ५० हजार रुपये पगार असलेले लोक वार्षिक १.८० लाख रुपये वाचवू शकतात. तुम्ही दर महिन्याला १५ हजार रुपये वाचवता तेव्हा त्यातील ५ हजार रुपये इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा. तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला ५ हजार रु. मध्ये SIP करू शकता. याशिवाय उरलेले ५ हजार रुपये रेकरिंग डिपॉझिट किंवा गोल्ड बाँडमध्ये गुंतवता येतील. जेव्हा जेव्हा तुमचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा. जर तुम्ही १० वर्षे या फॉर्म्युल्यासह बचत आणि गुंतवणूक करत राहिल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. अडचणीच्या काळातही या रक्कमेची मोठी मदत होईल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: If you have a monthly salary of 50,000, how much should you save?; Know About Saving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.