Lokmat Money >गुंतवणूक > घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज

घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज

फिक्स्ड डिपॉझिट हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग मानला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:02 PM2023-11-09T14:02:08+5:302023-11-09T14:04:09+5:30

फिक्स्ड डिपॉझिट हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग मानला जातो.

If you need money every month for household expenses do this FD there will be no shortage you will get good interest investment tips | घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज

घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज

फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग मानला जातो. ही एक लोकप्रिय बचत योजना आहे कारण त्यात परताव्याची हमी आणि पैसे गमावण्याचा धोका नगण्य आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमधूनही दरमहा कमाई करू शकता. तुमचा अत्यावश्यक खर्च भागवण्यासाठी बँकेनं तुम्हाला दर महिन्याला, तिमाहीत किंवा सहामाहीत एफडीवर व्याज द्यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर हे शक्य आहे. वास्तविक, जर तुम्ही तुमचे पैसे नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये (Non-Cumulative FD) गुंतवले तर काही काळानंतर पैसे तुमच्या हातात येत राहतील.

फिक्स्ड डिपॉझिटचे दोन प्रकार आहेत - क्युम्युलेटिव्ह एफडी आणि नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी. वास्तविक, या दोन्ही प्रकारच्या एफडी व्याजा देण्याच्या आधारावर निरनिराळ्या आहेत. पहिला पर्याय म्हणजे क्युम्युलेटिव्ह एफडी, जिथे मुदतपूर्तीवर मुद्दल आणि व्याज दोन्ही जोडून रक्कम मिळते. तर नॉन-क्युम्युलेटिव्ह स्कीममध्ये, तुम्हाला मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आधारावर व्याज हवे आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता.

मिळते अधिक लिक्विडिटी
एसबीआय आणि आयसीआयसीआयसह अनेक बँकांद्वारे नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी ऑफर केली जाते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे क्युम्युलेटिव्ह एफडीच्या तुलनेत नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी थोडे कमी व्याज देते. येथे चक्रवाढीचा लाभही मिळत नाही, कारण ठराविक अंतरानं व्याज काढलं जातं. पण, त्याचा फायदा असा आहे की तुमच्या हातात नेहमीच पैसा असतो. नॉन-क्युम्युलेटिव्ह फिक्स डिपॉझिटवर देखील कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही.

कोणासाठी योग्य
नॉन-क्युम्युलेटिव्ह फिक्स डिपॉझिट्स अशा लोकांसाठी योग्य आहेत ज्यांच्याकडे जमा केलेल्या भांडवलाशिवाय उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही किंवा अन्य कोणत्याही स्त्रोतातून उत्पन्न मिळत नाही. जर त्यांनी त्यांची बचत क्युम्युलेटिव्ह फिक्स डिपॉझिट्समध्ये गुंतवली तर त्यांना सतत पैसे मिळणार नाहीत आणि फक्त मॅच्युरिटीवर पैसे मिळतील. त्याच वेळी, नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये, त्यांचे पैसे देखील सुरक्षित राहतील, त्यांना परतावा मिळेल आणि दर महिन्याला किंवा तीन महिन्यांनी व्याजाच्या स्वरूपात त्यांच्या हातात पैसे मिळत राहतील.

Web Title: If you need money every month for household expenses do this FD there will be no shortage you will get good interest investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.