Lokmat Money >गुंतवणूक > कामाची बातमी! वेळेआधी होमलोनची परतफेड कशी करायची? हे ५ मुद्दे समजून घ्या

कामाची बातमी! वेळेआधी होमलोनची परतफेड कशी करायची? हे ५ मुद्दे समजून घ्या

आपले स्वत:चे घर असावे हे स्वप्न प्रत्येकाचे असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण बँकेतून होमलोन (Home Loan) घेतात. पण या लोनची परतफेड करण्यासाठी अनेक वर्षांची मुदत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:43 AM2022-10-25T11:43:30+5:302022-10-25T11:51:23+5:30

आपले स्वत:चे घर असावे हे स्वप्न प्रत्येकाचे असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण बँकेतून होमलोन (Home Loan) घेतात. पण या लोनची परतफेड करण्यासाठी अनेक वर्षांची मुदत असते.

If you save money in these five ways you can pay off your home loan early | कामाची बातमी! वेळेआधी होमलोनची परतफेड कशी करायची? हे ५ मुद्दे समजून घ्या

कामाची बातमी! वेळेआधी होमलोनची परतफेड कशी करायची? हे ५ मुद्दे समजून घ्या

आपले स्वत:चे घर असावे हे स्वप्न प्रत्येकाचे असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण बँकेतून होमलोन (Home Loan) घेतात. पण या लोनची परतफेड करण्यासाठी अनेक वर्षांची मुदत असते. पण काही जणांना या लोनची कमी कालावधीत परतफेड करायची असते. कमी कालावधीत परतफेड केल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होतो. जर तुम्ही होमलोन घेतले असेल आणि तुम्हाला ते लोन कमी कालावधीत फेडायचे असेल तर तुमच्यासाठी ही माहिती कामाची आहे. 

बचत वाढवा

आपण वयाच्या २०-३० व्या वर्षी होमलोन घेतले असेल. यावेळी आपल्याकडे लोन फेडण्यासाठी भरपूर वर्ष असतात. यासाठी तुम्हाला पैशाचे नियोजन करावे लागेल. पैशाची बचत, पगार वाढ, बोनस आणि अतिरिक्त कमाईसह, एकूण कर्जाच्या कालावधीतून ८-१० वर्षे कमी होतात. अतिरिक्त कमाईसह, तुम्ही होमलोनचे काही पैसे भरू शकता आणि व्याजाचे पैसे देऊ शकता. त्यामुळे कर्जाचा कालावधी कमी होईल.

महागाईचा पुन्हा बसणार झटका! पाम तेलाने चिंता वाढवली, खाद्यतेल महागणार?

 म्युच्युअल फंड

जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक केली असेल तर काही वर्षांनी तुम्हाला याचा चांगला परतावा मिळेल. समजा तुम्ही २५ वर्षांसाठी २५ लाखांचे गृहकर्ज घेतले असेल यासह तुम्ही दरमहा एसआयपीमध्ये ५ हजार रुपये रुपये जमा करता. त्यानुसार १५ वर्षांनंतर तुम्हाला त्याचे २४ लाख रुपये मिळतील. या परताव्यातून तुम्ही होमलोनची परतफेड करु शकता.

कर्जाच्या हप्त्याची रक्कम वाढवा

तुम्ही गृहकर्जाचा ईएमआय कमी भरत असाल तर तुम्हाला जास्त दिवस व्याज भरावे लागणार आहे. यासाठी तुम्ही तोच ईएमआय वाढवला तर तुम्हाला आणकी फायदा होणार आहे. जास्त ईएमआय म्हणजे जास्त व्याज देणे. यासाठी तुम्हाला बँकेकडे जावे लागेल आणि कर्जाचे पुनर्गठन करावे लागेल. अधिक ईएमआय भरल्याने कालावधी कमी होईल आणि कर्जाची परतफेड लवकरच होईल.


कर्ज ट्रान्फर करुन घ्या 

जर तुम्हाला कर्जावरील (Home Loan) सध्याच्या व्याजदराने त्रास होत असेल, तर तुम्ही कर्ज स्वस्त व्याजासह दुसऱ्या बँकेत ट्रान्फर करु शकता. जर कर्ज घेतले तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल. आणि पुन्हा तुमचा क्रेडिट स्कोअर वाढला, तर तुम्हाला कमी व्याजाच्या योजनेत कर्ज ट्रान्फर करता येते. यामुळे तुमचे व्याजदर कमी होणार आहे. 

ओव्हरड्राफ्ट

काही बँका (Bank) ओव्हरड्राफ्ट खात्यासह होमलोन देतात. ईएमआय व्यतिरिक्त, तुम्ही या खात्यात अतिरिक्त ठेवी ठेवू शकता. हीच रक्कम होमलोनसाठी प्रीपेमेंट म्हणून वापरली जाते. तुम्हाला प्रीपेमेंटसाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही,पण दरमहा काही रक्कम यात जोडून, ​​तुम्ही कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी मदत घेऊ शकता. यामुळेही तुम्ही होमलोन लवकर फेडू शकता.  

Web Title: If you save money in these five ways you can pay off your home loan early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक