Lokmat Money >गुंतवणूक > सुकन्‍या समृद्ध‍ि, PPF, SCSS च्या नियमांत महत्वाचा बदल; ...अन्यथा बसेल मोठा फटका! आदेश जारी

सुकन्‍या समृद्ध‍ि, PPF, SCSS च्या नियमांत महत्वाचा बदल; ...अन्यथा बसेल मोठा फटका! आदेश जारी

जर आपणही सरकारच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नसेल, तर आपल्याला लवकरात लवकर ते तयार करून घ्यावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 03:56 PM2023-07-14T15:56:18+5:302023-07-14T15:57:35+5:30

जर आपणही सरकारच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नसेल, तर आपल्याला लवकरात लवकर ते तयार करून घ्यावे लागेल.

Important changes in rules of Sukanya Samriddhi now pan and aadhaar card mandatory to invest | सुकन्‍या समृद्ध‍ि, PPF, SCSS च्या नियमांत महत्वाचा बदल; ...अन्यथा बसेल मोठा फटका! आदेश जारी

सुकन्‍या समृद्ध‍ि, PPF, SCSS च्या नियमांत महत्वाचा बदल; ...अन्यथा बसेल मोठा फटका! आदेश जारी

केंद्रातील मोदी सरकारने पब्लिक प्रोव‍िडेंट फंड (PPF), सिन‍ियर स‍िटीझन सेव्हिंग स्‍किम (SCSS), सुकन्या समृद्धि योजना (SSY), महिला सन्मान योजना आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी न‍ियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. आता या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांकडे पॅन (PAN)आणि आधार (AADHAAR) कार्ड असणए आवश्यक आहे. हा बदल 1 एप्रिल, 2023 पासून लागू झाला आहे. जर आपणही सरकारच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नसेल, तर आपल्याला लवकरात लवकर ते तयार करून घ्यावे लागेल.

पारदर्शकतेच्या दृष्टीने बदल -
जर आपल्याकडे पॅन आणि आधार नसेल तर आपल्याला या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सरकारकडून हा बदल योजना अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने करण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या अधिकाराचेही संरक्षण होईल. अर्थमंत्रालयाने गेल्यावर्षी एक नोटीस जारी करत, सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार (Aadhaar) आणि पॅन (PAN) अनिवार्य असेल, असे म्हटले होते. यापूर्वी, या योजनांमध्ये आधार क्रमांकाशिवायदेखील गुंतवणूक केली जाऊ शकत होती. 

गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड आवश्यक - 
संबंधित नोटिशीत म्हणण्यात आले आहे की, गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आधार संख्या जमा करावी लागेल. तसेच, एका मर्यादेपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागेल. हा बदल सरकारकडून चालविल्या जाणाऱ्य योजांमधील गुंतवणूक अधिक पारदर्शी आणि सुगम बनविण्यासाठी करण्यात आला आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपल्याला खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक सादर करावा लागेल. तसेच, जर आपण ठराविक मर्यादेपेक्षा अधिक गुंतवणूक करत असाल, तर आपल्याला पॅन कार्डदेखील जमा करावे लागेल.

स्‍मॉल सेव्हिंग स्‍किमचे खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे -
- पासपोर्ट साइज फोटो
- आधार क्रमांक अथवा आधार एनरोलमेंट स्‍ल‍िप
- PAN क्रमांक, 
सध्याच्या गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड जमा केले नाही, तर 1 ऑक्‍टोबर 2023 पासून त्यांचे अकाउंट बॅन केले जाईल.
 

Web Title: Important changes in rules of Sukanya Samriddhi now pan and aadhaar card mandatory to invest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.