Join us

महाराष्ट्रात प्रत्येक चौथी व्यक्ती शेअर गुंतवणूकदार, ८० टक्के खातेधारकांची ५० हजारांपेक्षा अधिकची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:07 PM

देशातील तब्चल २६ कोटी लोक शेअर बाजारात नोदणीकृत गुंतवणूकदार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील तब्चल २६ कोटी लोक शेअर बाजारात नोदणीकृत गुंतवणूकदार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ५० टक्के हिस्सा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांचाच आहे. एका अभ्यासानुसार, ८० टक्के डीमॅट खातेधारकांनी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे बाजारात गुंतविले आहेत, देशाच्या १४० कोटी लोकसंख्येपैकी प्रत्येक नववा व्यक्त्ती शेअर बाजारातगुंतवणूक करीत आहे. २०१८ ते २०२३ या ५ वर्षाच्या काळात गुंतवणूकदारांची संख्या ४ पटींनी वाढलीये. 

महाराष्ट्र इथेही अव्वलच 

शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात अव्वलच आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ३.१२ कोटी गुतवणूकदार असून, एकूण गुंतवणूकदारातील त्यांचे प्रमाण २३.७० टक्के आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक चौथा व्यक्ती बाजारात गुंतवणूक करीत आहे. 

गुजरातमध्ये प्रत्येक ५वा व्यक्ती, हरियाणात ६ वा. पंजाबमध्ये प्रत्येक ८ वा, उत्तर प्रदेशात १४वा, झारखंडात १५वा आणि बिहारात प्रत्येक २१वा व्यक्ती गुंतवणूकदार आहे. विहारात गुंतवणूकदाराची सख्या सर्वाधिक तेजीने वाढत आहे. नऊ मोठ्या राज्यांत बिहारमघ्ये एका वर्षात सर्वाधिक ४४ टक्के गुंतवणूकदार वाढले. 

२५ ते ५० वयोगटांतील ६१ टक्के :

  • २०१८ मध्ये २५पेक्षा कमी वयाच्या गुतवणूकदारांचा हिस्सा ६.३% होता. ३१ डिसेंबर २०२३ रोजी तो वाढून १३.६% झाला.
  • २५ ते ५० या वयोगटातील संख्याही या काळात ४६ टक्क्यावरून वाढून ६१% झाली.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक