जेव्हा एखाद्याला पहिल्यांदा नवीन नोकरी मिळते, तेव्हा पगार मिळाल्यानंतर ती व्यक्ती सर्वात पहिलं काम करते ते म्हणजे आपले छंद पूर्ण करणे. कुटुंबीयांसाठी भेटवस्तू वगैरेही इत्यादी आणल्या जातात. बहुतेक तरुण करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात बचत आणि गुंतवणुकीचा विचार करत नाहीत. बचत करण्यासाठी त्यांना संपूर्ण आयुष्य घालवावं लागेल असं त्यांना वाटत असतं. परंतु तज्ज्ञांचे असं मत आहे की जितक्या लवकर तुम्ही बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय लावाल, तितक्या लवकर तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकाल.
बचत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही किती बचत केली किंवा किती गुंतवणूक केली याने काही फरक पडत नाही, तर त्याची सुरुवात करणे आणि या बाबतीत शिस्तबद्ध असणं महत्त्वाचं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही थोडी बचत करूनही काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करू शकता. जर तुम्हालाही नवीन नोकरी मिळाली असेल, तर नवीन वर्ष 2024 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. तुमचा पगार खूप जास्त नसला तरीही 25,000 रुपयांच्या पगारातही 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम जोडू शकता. पाहूया कसं.
किती पैसे वाचवावे?
कोट्यधीश होण्यासाठी सर्वप्रथम बचत करण्याची सवय लावणं सर्वात महत्त्वाचं आहे. आर्थिक नियम सांगतो की, तुम्ही तुमच्या उत्पन्नातील किमान 20 टक्के बचत केली पाहिजे. अशा परिस्थितीत तुमचा पगार 25 हजार रुपये असेल तर तुम्ही 5000 रुपयांची बचत केली पाहिजे. जर बचत गुंतवली नाही तर ती नेहमी खर्च होते, तर गुंतवणुकीमुळे तुमची संपत्ती वाढते. म्हणून, आपल्या बचत कोणत्याही परिस्थितीत गुंतवली पाहिजे.
कसा जमेल कोटींचा फंड?
तुम्हाला तुमच्या बचतीतून कोटींचा फंड तयार करायचा असेल, तर तुम्ही तो SIP मध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा. म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे पैसे गुंतवले जातात. तज्ज्ञांच्या मते, ते सरासरी 12 टक्के परतावा देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दीर्घकालीन एसआयपी सुरू केली तर त्यातून पैसे कमविणे ही काही मोठी गोष्ट नाही.
समजा तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली आणि ती 30 वर्षे सतत चालू ठेवली, तर 30 वर्षात तुम्ही एकूण 18 लाख रुपये गुंतवाल आणि तुम्हाला 1,58,49,569 रुपयांचं व्याज मिळतील. अशाप्रकारे, 30 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1,76,49,569 रुपये मिळतील आणि तुम्ही थोड्या गुंतवणुकीनं कोट्यधीश व्हाल. तुमची मिळकत वाढत असताना तुम्ही ही गुंतवणूक वेळोवेळी वाढवत राहिल्यास, तुम्ही ३० वर्षापूर्वीच कोट्यधीश होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)