प्रत्येकजण मागच्या पिढीने खाल्लेले ठसेठोमसे पाहून भविष्याबाबत सावध झाला आहे. आता कुठे बाजारात जाऊन यायचे म्हटले की सहज ५०० रुपयांची नोट खर्च होऊन जाते. पूर्वी १०० रुपये पुरायचे. एवढी महागाई झाली आहे. यामुळे आत्ता कुठे चाळीशीत पोहोचलेली पिढी भविष्य़ाच्या गुंतवणुकीकडे वळू लागली आहे. जे रिटायर्ड होतायत त्यांच्या हाती पैसा येत आहे परंतु तो आजच्या काळात पुरेसा नाहीय. अशावेळी याच पैशांतून योग्य गुंतवणूक केली तर हा पैसा थोडा का होईना वाढणार आहे.
या लोकांमध्ये पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम लोकप्रिय आहे. ही योजना वरिष्ठ नागरिकांसाठी आहे. यावर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत एफडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना सुरु आहेत. यामध्ये गुंतवणूक करून 20,000 रुपये दर महिना कायमचे उत्पन्न निर्माण करता येते. सरकारने १ जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी POSSC योजनेसाठी 8.2 टक्क्यांचा व्याजदर ऑफर केला आहे. यातून करात सूट देखील मिळणार आहे.
या योजनेत अकाऊंट सुरू करून १००० रुपये ते ३० लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतविता येते. रिटायर्मेंटनंतर आर्थिक संरक्षण हवे असेल तर ही योजना घेता येते. यामध्ये ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला पती, पत्नीसोबत जॉईंट अकाऊंट उघडले जाऊ शकते. यामध्ये महिन्याला २० हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते.