Join us

Income Tax: ना गुंतवणूक ना विमा; एका क्लिकवर होईल 50 हजारांची बचत, ITR भरताना हे काम करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 5:50 PM

Save Income Tax: आयकर रिटर्न्स भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे पैसे वाचवण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू झाली आहे.

Income Tax Saving Tips : आयकर रिटर्न्स (ITR) भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे पैसे वाचवण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू झाली आहे. ज्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे, त्यांच्याकडे कर बचतीसाठी फार पर्याय नाहीत. यामागचे एक कारण असे आहे की, नवीन कर प्रणालीतील व्याज दर किंचित कमी आहेत. जे लोक जुन्या प्रणालीचा अवलंब करणार आहेत त्यांच्याकडे कर कमी करण्यासाठी काही पर्याय असतील. परंतु तुम्ही कोणत्याही गुंतवणूकीशिवाय किंवा विम्याशिवाय कर वाचवू शकता. जाणून घ्या कसे...

आयकर अधिनियम 1961 च्या कलम 16 अन्वये, प्रत्येकजण स्टँडर्ड कपातीचा फायदा घेऊ शकतो. यावर दावा करण्यासाठी, आपल्याला कोणतीही कागदपत्रे सबमिट करण्याची आवश्यकता नाही. जर कोणी पेन्शनर असेल तर तोदेखील या स्टँडर्ड कपातीचा फायदा घेऊ शकतो. यासाठी आपल्याला विमा खरेदी करण्याची किंवा गुंतवणूकीचा कोणताही पुरावा दाखवण्याची आवश्यकता नाही.

महागाई लक्षात ठेवून सरकार वेळोवेळी स्टँडर्ड डिडक्शनमध्ये बदल करत राहते. सध्या आयकर देयक 50,000 रुपयांपर्यंतचे स्टँडर्ड डिडक्शन घेऊ शकतात. याचा अर्थ असा की, आपण काहीही न करता 50,000 रुपयांची बचत करू शकतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केवळ 50,000 रुपयांमुळे टॅक्सेबल स्लॅबवर येणाऱ्या लोकांना होईल. स्टॅंडर्ड डिडक्शनमुळे आपले करपात्र उत्पन्न 50,000 रुपयांपर्यंत कमी होते.

आधी ही स्टँडर्ड डिडक्शन सुविधा केवळ जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना मिळायची. पण, या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. आता आपण कोणतीही कर व्यवस्था निवडता, आपण 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शन मिळवू सकता. महत्वाची बाब म्हणजे, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

टॅग्स :व्यवसायइन्कम टॅक्सगुंतवणूक