Lokmat Money >गुंतवणूक > देशात रोजगाराच्या संधी वाढल्या; ऑक्टोबरमध्ये 10% वाढ, उत्पादन क्षेत्रात तेजी...

देशात रोजगाराच्या संधी वाढल्या; ऑक्टोबरमध्ये 10% वाढ, उत्पादन क्षेत्रात तेजी...

गेल्या काही वर्षात भारतातील मोठ्या उद्योगांमध्ये वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:25 PM2024-11-05T15:25:26+5:302024-11-05T15:29:38+5:30

गेल्या काही वर्षात भारतातील मोठ्या उद्योगांमध्ये वाढ झाली आहे.

Increased employment opportunities in the country; 10% growth in October, boom in manufacturing | देशात रोजगाराच्या संधी वाढल्या; ऑक्टोबरमध्ये 10% वाढ, उत्पादन क्षेत्रात तेजी...

देशात रोजगाराच्या संधी वाढल्या; ऑक्टोबरमध्ये 10% वाढ, उत्पादन क्षेत्रात तेजी...

Employment in India: देशात रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. ऑक्टोबर महिना भारतातील नोकऱ्यांसाठी चांगला ठरला आहे.  ऑक्टोबरमध्ये देशभरातील नोकऱ्यांमध्ये 10% वाढ झाली आहे. तसेच, उत्पादन क्षेत्रातही चांगला विकास दिसून आला आहे. ऑक्टोबरमध्ये व्हाईट कॉलर नोकऱ्यांमध्ये 10% वाढ दिसून आली आहे. Naukri Jobspeak Index नुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग सारख्या नवीन नोकऱ्यांची मागणी वाढली आहे. तेल, वायू, आरोग्य, FMCG आणि IT सारख्या क्षेत्रातही चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

शहरांमध्ये, विशेषतः कोलकाता आणि अहमदाबादमध्ये रोजगाराच्या संधी लक्षणीय वाढल्या आहेत. कंपन्या आता या शहरांमध्येही काम करत असून, लोकांना रोजगार देत आहेत. उत्पादन क्षेत्रातही वाढ नोंदवण्यात आली आहे.

भारतातील उद्योगधंदेही तेजीत 
या अहवालानुसार, भारतातील मोठ्या उद्योगांमध्येही वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, यंत्रसामग्री आणि औषधे तयार करण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. गेल्या 10 वर्षांत या उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या उत्पादन संबंधित प्रोत्साहन योजनादेखील उत्पादन वाढविण्यात आणि या उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्यास मदत करत आहेत.

उत्पादन क्षेत्रात तेजी 
भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ऑक्टोबरमध्ये 57.5 वर पोहोचला, जो मागील महिन्यातील 56.5 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ नवीन ऑर्डर आणि आंतरराष्ट्रीय विक्रीही वाढली आहे. कंपन्यांनी अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. याशिवाय कच्चा माल आणि उत्पादनाच्या किमतीही वाढल्या आहेत. या सर्व गोष्टी दर्शवितात की भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे आणि आशा आहे की भविष्यात अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशाप्रकारे ऑक्टोबर महिना नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगला आहे.

Web Title: Increased employment opportunities in the country; 10% growth in October, boom in manufacturing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.