Join us  

भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 7:11 PM

India Forex Reserves: 2024 मध्ये आतापर्यंत भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 66 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Foreign Exchange Reserves : गोल्ड रिझर्व्हच्या (Gold Reserve) मूल्यातील वाढीमुळे भारताच्या परकीय चलन साठ्याने (Foreign Exchange Reserves) पुन्हा एकदा नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर 2024 पर्यंत भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियनने वाढून $689.48 अब्ज झाला आहे. हा गेल्या आठवड्यात $689.23 अब्ज होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज, 20 सप्टेंबर 2024 रोजी परकीय चलनाच्या साठ्याचा डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार परकीय चलन साठा 223 मिलियन डॉलर्सने वाढून 689.45 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. मात्र, या काळात परकीय चलन संपत्तीत घट झाली आहे. विदेशी चलन संपत्ती $515 मिलियनने घसरुन $603.62 अब्जवर आली आहे. आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही मोठी झेप झाली असून, हा 899 मिलियन डॉलर्सने वाढून 62.88 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 

या कालावधीत SDR $53 मिलियनने घसरुन $18.41 अब्ज झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जमा असलेला साठा 108 मिलियन डॉलरने कमी होऊ 4.52 अब्ज डॉलरवर आला आहे. दरम्यान, चलन बाजारात रुपया 13 पैशांनी मजबूत झाला असून, एका डॉलरच्या तुलनेत 83.56 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. हा गेल्या सत्रात 83.69 होता.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये 33,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, जी मार्च 2024 मध्ये 35,100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळेच शुक्रवार 20 सप्टेंबर 2024 च्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाला आहे आणि यामुळे परकीय चलनाचा साठा सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, 2024 मध्ये आतापर्यंत भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 66 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

टॅग्स :भारतअर्थव्यवस्थागुंतवणूक