Semiconductor Factories: जगातील सर्वात मोठा 'सेमीकंडक्टर हबट बनण्याच्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत आहे. या उद्दिष्टाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी गुजरात आणि आसाममध्ये तीन सेमीकंडक्टर कारखाने सुरू करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यात सूमारे 1.26 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, "तिन्ही युनिट्स बांधण्याचे काम येत्या 100 दिवसांत सुरू होईल." यातील दोन कारखाने गुजरातमध्ये आणि एक कारखाना आसाममध्ये उभारण्यात येणार आहे.
गुजरातमधील धोलेरा येथील सेमीकंडक्टर हबअश्विनी वैष्णव म्हणाले की, Tata Electronics Pvt Ltd. तैवानच्या Powerchip Semiconductor Manufacturing Corp. (PSMC) सोबत भागीदारी करून गुजरातच्या ढोलेरामध्ये सेमीकंडक्टर हबची स्थापना करेल. यामध्ये 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याशिवाय टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आसामच्या मोरीगाव येथेही सेमीकंडक्टर कारखाना स्थापन करणार आहे.
साणंदमध्येही कारखाना उभारणार गुजरातवैष्णव पुढे म्हणाले की, सीजी पॉवर, जपानच्या रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आणि थायलंडच्या स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिकच्या सहकार्याने, गुजरातमधील साणंदमध्ये सेमिकंडक्टर कारखाना उभारणार आहे. साणंदच्या या कारखान्यात 7,600 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे या दोन्ही राज्यात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत.