Lokmat Money >गुंतवणूक > भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश

भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश

सरकारने चीनी मोबाइल कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 02:53 PM2023-06-13T14:53:32+5:302023-06-13T14:53:39+5:30

सरकारने चीनी मोबाइल कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे.

India to China; If you want to do business in India, find an Indian 'boss'; Government order to Chinese companies | भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश

भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश


नवी दिल्ली : भारतात चिनी स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. Xiaomi, Oppo, Coolpad, OnePlus सारख्या स्मार्टफोन कंपन्या भारतात त्यांचा व्यवसाय करतात. पण, आता भारत सरकारने या कंपन्यांवर आपली पकड घट्ट केली आहे. चिनी मोबाईल कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावे लागतील, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. 

चिनी स्मार्टफोन कंपन्यांसाठी कठोर भूमिका घेत सरकारने म्हटले की, जर त्यांना त्यांचा कोणताही माल किंवा फोन भारतात विकायचा असेल, तर त्यांनी आधी त्यांचा भारतीय भागीदार निवडला पाहिजे. भारतीय भागीदार जोडल्याशिवाय ते भारतात उत्पादन करू शकणार नाहीत. चिनी कंपन्यांना आपला मोबाईल फोन किंवा इतर उत्पादने भारतात बनवायची आणि विकायची असेल, तर सरकारच्या अटींचे पालन करावेच लागेल. 

सरकारने स्पष्टपणे म्हटले की, जर चिनी कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर त्यांचे स्थानिक भागीदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), मुख्य कार्यकारी अधिकारी (COO), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) भारतीय असावेत. अशा पदांवर भारतीय अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच आता चिनी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी भारतीय बॉसची गरज भासणार आहे. 
 

Web Title: India to China; If you want to do business in India, find an Indian 'boss'; Government order to Chinese companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.