Indian Railways : भारतात आजही रेल्वे सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचे साधन आहे. दरररोज कोट्यवधी लोग रेल्वेने प्रवास करतात. भारतात जनरल ट्रेन ते सुपरफास्ट एक्सप्रेसपर्यंत, सर्व प्रकारच्या ट्रेन्स उपलब्ध आहेत. ट्रेनमध्ये लांबचा प्रवास कमी पैशात करता येतो. सध्या देशात सुमारे 15 हजार गाड्या धावत आहेत. यातील अनेक गाड्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, भारतीय रेल्वेला ट्रेन बनवण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत.
ट्रेनची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल
ट्रेनमध्ये जनरल, स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी, असे बरेच वेगवेगळे डबे असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ट्रेनच्या फक्त एका एसी कोचची किंमत सुमारे 2 कोटी रुपये असते. दुसरीकडे, स्लीपर कोचसाठी दीड कोटी रुपये आणि जनरल कोच बनवण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च येतो. ट्रेनच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत सर्वात जास्त आहे. ट्रेनचे इंजिन सुमारे 20 कोटी रुपयांमध्ये बनते. म्हणजेच भारतीय रेल्वे जर 25 बोगी असलेली ट्रेन तयार करणार असेल, तर त्यासाठी किमान 60 ते 80 कोटी रुपये खर्च येतो.
सर्व गाड्यांची किंमत वेगळी आहे
गाड्यांमधील सुविधा, आधुनिकीकरण आणि एसी कोचची संख्या, यानुसार त्याची किंमत बदलते. 19 बोगी असलेली अमृतसर शताब्दी तयार करण्यासाठी रेल्वेला 60 कोटी रुपये खर्च येईल. वंदे भारत एक्सप्रेस आतापर्यंत केवळ 13 मार्गांवर चालवण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी भारतीय रेल्वे सुमारे 120 कोटी रुपये खर्च आला आहे.