IndiGo Airline: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) 2023-24 आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल (IndiGo Q1 Results) जाहीर केले आहेत. विमान उद्योगातील तेजीचा चांगलाच फायदा झाला असून, कंपनीला सुमारे 3100 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत एअरलाइनला 1063 कोटी रुपयांचा मोठा तोटा झाला होता. कंपनीचा शेअर 0.2 टक्क्यांच्या घसरणीसह रु. 2565 च्या पातळीवर बंद झाला.
इंडिगो Q1 निकाल
बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल-जून तिमाहीत एअरलाइनचा निव्वळ नफा 3090 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत एअरलाइनला 1064 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. करपूर्व नफा म्हणजेच PBT 3090 कोटी रुपये होता. पीबीटी मार्जिन 18.5 टक्के आहे. वर्षभरापूर्वी हे 8.3 टक्के होता. जून तिमाहीत एअरलाईनचा EBITDA 717 कोटी रुपयांवरून 5210 कोटी रुपयांवर वाढला आहे. वार्षिक आधारावर EBITDA मार्जिन 5.6 टक्क्यांवरून 31.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
वार्षिक आधारावर 18.8 टक्के वाढीसह ASK म्हणजेच उपलब्ध सीट किलोमीटर 32.7 अब्ज झाला. एअरलाइन्सची एकूण कार्यरत विमाने 316 वर पोहोचली आहेत. एका वर्षात एअरलाइनने 35 नवीन विमानांची भर घातली आहे. 5 डोमेस्टिक आणि 6 इंटरनॅशनल डेस्टिनेशन जोडली गेली आहेत. एअरलाइन आता 78 देशांतर्गत आणि 26 आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनवर सेवा देत आहे.