Vibrant Gujarat Global Summit: गुजरातमध्ये आज(दि.10) मोठ्या थाटा माटात 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट-2024'चे उद्घाटन झाले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अहमदाबादला पोहोचले होते. दरवेळेप्रमाणेच यंदाही देश-विदेशातील अनेक उद्योगपतींनी यात सहभाग नोंदवला. यावेळी रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच, राज्यात गुंतवणुकीबाबतही अनेक घोषणा केल्या.
#WATCH | Vibrant Gujarat Global Summit 2024 | Reliance Industries Chairman and MD Mukesh Ambani says, "...Reliance was, is and will always remain a Gujarati company...Reliance has invested over 150 billion dollars - Rs 12 Lakh Crores - in creating world-class assets and… pic.twitter.com/HCjCbaavAm
— ANI (@ANI) January 10, 2024
आपल्या भाषणात अंबानी यांनी पंतप्रधान मोदींचे वर्णन 'देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान' असे केले. अंबानी म्हणाले की, 'अशा प्रकारची दुसरी कोणतीही शिखर परिषद 20 वर्षांपासून सातत्याने सुरू नाही. ही शिखर दरवर्षी अधिक मजबूत होत आहे, याचे कारण पीएम मोदींची दूरदृष्टी आणि सातत्य आहे. आज गुजरात आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार बनले आहे,' असं अंबानी म्हणाले.
'मोदी है तो मुमकिन है'
अंबानी पुढे म्हणाले की, 'लाखो करोडो भारतीय म्हणत असलेल्या 'मोदी है तो मुमकिन है' घोषणेचा अर्थ काय, असे जेव्हा माझे विदेशातील मित्र मला विचारतात, तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगितो की, या घोषणेचा अर्थ भारताच्या पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि दृढनिश्चयाने अशक्य गोष्टी देखील शक्य करणे आहे. यामुळे माझे परदेशी मित्रही माझ्याशी सहमत असतात.
#WATCH | Vibrant Gujarat Global Summit 2024 | Reliance Industries Chairman and MD Mukesh Ambani says, "Welcome to Gujarat and the 10th Vibrant Gujarat Summit - the most prestigious investors summit in the world today. No other summit of this kind has continued for 20 long years… pic.twitter.com/XO6GHSRSUd
— ANI (@ANI) January 10, 2024
पंतप्रधान मोदी जगाच्या विकासावर बोलतात
गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदी म्हणायचे की, भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास आवश्यक आहे. मोदींनी गुजरातला भारताच्या विकासाचे इंजिन बनवले. आज देशाचे पंतप्रधान नात्याने मोदी जगाच्या विकासासाठी भारताच्या विकासाबद्दल बोलतात. पंतप्रधान या मंत्रावर काम करत आहेत आणि भारताला जगाच्या विकासाचे इंजिन बनवत आहेत. पीएम मोदींनी विकसित भारताचा पाया रचला आहे.
अंबानी लवकरच गिगा कारखाना सुरू करणार
मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये लवकरच त्यांचा बॅटरी उत्पादन कारखाना सुरू करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आमची कंपनी 2024 च्या उत्तरार्धात गुजरातमध्ये गीगा कारखाना सुरू करण्यास तयार आहे. येत्या काही वर्षांत गुजरात भारताच्या आर्थिक विकासाचे प्रवेशद्वार बनेल. राज्याचा जीडीपी 2047 पर्यंत $3000 अब्जपर्यंत पोहोचेल आणि 2047 पर्यंत भारताला $3.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. रिलायन्स राज्यातील हजीरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अदानी-मित्तल-टाटा-मारुतीच्या मोठ्या घोषणा
व्हायब्रंट गुजरातमध्ये अदानी समूहाचे गौतम अदानी, आर्सेलर मित्तलच्या लक्ष्मी मित्तल, टाटा समूहाचे एन. चंद्रशेखरन आणि मारुती सुझुकीचे तोशिहिरो सुझुकीही सहभागी झाले होते. या सर्वांनी आगामी काळात गुजरातमधील गुंतवणूकीबाबत मोठ्या घोषणा केल्या.
संबंधित बातमी- सुझुकी ३५००० कोटी, डीपी वर्ल्ड ३ अब्ज डॉलर्स गुंतवणार; मित्तल सर्वांत मोठी स्टील फॅक्ट्री उभारणार