indigo black friday sale : विमानाने जग फिरण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. तेही जाऊद्या. विमानात किमान एकदा तरी बसावं अशी तर अनेकांची इच्छा असते. मात्र, विमान प्रवासाचे तिकीट कित्येकांच्या आवाक्याबाहेर असल्याने शक्य होत नाही. मात्र, आता हे सहज होऊ शकणार आहे. तुम्ही ट्रॅव्हल बसच्या तिकिटात विमान प्रवास करू शकाल. देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तिकिटांच्या किमतीत कमालीची घट केली आहे. कंपनीने देशांतर्गत उड्डाणांसाठी वन-वे तिकिटांची सुरुवातीची किंमत ११९९ रुपये ठेवली आहे. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तिकिटांची सुरुवातीची किंमत ५१९९ रुपये ठेवण्यात आली आहे. एवढच नाही तर सीट बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त ९९ रुपये खर्च करावे लागतील.
इंडिगोने फक्त तिकिटांवरच सूट दिली असं नाही. तर आणखी बऱ्याच सेवांवर प्रवाशांची मोठी बचत होणार आहे. प्री-पेड ऍक्सेस बॅगेजवर प्रवाशांना १५% सूट मिळू शकते. त्याचवेळी, फास्ट फॉरवर्ड सेवेवर ५० टक्के रक्कम वाचवणार आहे. याशिवाय देशांतर्गत विमान प्रवासासाठी ट्रॅव्हल असिस्टंटसाठी केवळ १५९ रुपये खर्च करावे लागतील. ही ऑफर आजच तिकीट बुकिंगवर उपलब्ध आहे.
इंडिगोने काय म्हटलं?
एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे, “ब्लॅक फ्रायडे सेल इंडिगोच्या ग्राहकांना उत्कृष्ट प्रवास सेवा आणि उत्तम सुविधा देण्यास प्रतिबद्ध आहे. ही ऑफर ग्राहकांना पुढील वर्षासाठी सहलीचं नियोजन करण्याची संधी देते. यात फ्लाइट्स आणि ॲड-ऑन सेवांवर आकर्षक ऑफर्स आहेत,” अलीकडच्या काळात अनेक नवीन मार्गांचा सेवेत समावेश केल्याचेही एअरलाइनने सांगितले.
कशी आहे इंडिगो कंपनीची सेवा?
इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी आणि लॉ कॉस्ट एअरलाइन आहे. जी प्रवाशांना परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट सेवा देते. २००६ मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून याचे मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. इंडिगोचे विस्तृत ६ई नेटवर्क असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी सेवा दिली जाते.