Join us

World Cup Final चा थरार अन् Disney+Hotstar ने दर सेकंदाला केली लाखोंची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 1:55 PM

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

INDvsSA T-20 World Cup Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी स्टार नेटवर्कवर हा थरारत सामना पाहिला. याशिवा डिस्ने + हॉटस्टार, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 कोटींहून अधिक दर्शक लाईव्ह पाहत होते. विशेष म्हणजे, या सामन्यादरम्यान डिस्ने-हॉटस्टारने प्रति सेकंद लाखो रुपयांची कमाई केली आहे.

काल(29 जून 2024) बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारताने काढलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 169 धावांवर संपुष्टात आला. 

डिस्ने + हॉटस्टारची बक्कळ कमाईभारताने T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर डिस्ने-हॉटस्टारने आपल्या जाहिरातींचे दरही वाढवले होते. डिस्ने स्टारकडे आयसीसी सामन्यांचे टीव्ही हक्कही आहेत, त्यामुळे टीव्हीच्या माध्यमातूनदेखील त्यांनी खुप कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने फायनल मॅचसाठी जाहिरात प्रसारित करण्याचे शुल्क 25-30 लाख रुपये प्रति 10 सेकंद केले होते. म्हणजेच, कंपनीने प्रति सेकंद जाहिरातींमधून सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये कमावले आहेत.

विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्टार स्पोर्ट्सने आपल्या चॅनलवर जाहिरातीची किंमत 13 ते 26 लाख रुपये प्रति 10 सेकंद ठेवली होती. हे दर भारताच्या सामन्यासाठी होते. तर, इतर देशांच्या सामन्यांसाठी जाहिरातींची फी 10 सेकंदाला 6.5 ते 7 लाख रुपये होती. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024व्यवसायगुंतवणूकभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका