Join us

महागाई वाढली, पण घर खरेदीवर परिणाम नाही; जोर कायम; Real Estate क्षेत्र मजबूत स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 12:17 PM

सध्या सर्वत्र महागाई वाढल्याचे चित्र असतानाही देशभरात घरांच्या खरेदीवर तितकासा परिणाम झालेला नाही.

सध्या सर्वत्र महागाई वाढल्याचे चित्र असतानाही देशभरात घरांच्या खरेदीवर तितकासा परिणाम झालेला नाही. प्रमुख ११ शहरांमध्ये घरखरेदीचा जोर कायम असल्याचे रिअल इस्टेट फर्म मॅजिकब्रिक्सच्या अहवालातून समोर आले आहे. वाढती मिळकत, आर्थिक स्थैर्यातील सातत्य यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चांगली मजबुती मिळाली आहे. 

लोकांना या टप्प्यावर नेमके काय हवे, खरेदी करताना त्यांचे प्राधान्य नेमके कशाला असेल हे जाणून घेण्यासाठी मॅजिकब्रिक्सने देशभरातील प्रमुख ११ शहरांमधील तब्बल ४,५०० हजार ग्राहकांची  मते जाणून घेतली. यात भारतातील निवासी घरांच्या क्षेत्रामध्ये मागणी असल्याचे दिसून आले. या क्षेत्राचा हाऊंसिंग सेंटिमेट्स इंडेक्स (एचएसआय) १४५ इतका असल्याचे अहवालात म्हटले आहे.  

कर्जासाठी बँकांवर अधिक विश्वास 

  • मध्यम वयोगटतील (२४ ते ३५) तरुणतरुणींमध्येही घरखरेदीची क्रेझ दिसत आहे. १० ते २० लाखांपर्यंतच्या किमतीच्या घरांमध्ये लोकांना सर्वाधिक रस आहे. जास्तीत जास्त सहभागींनी पुढील तीन वर्षात घर खरेदी करणार, असे सांगितले. 
  • सरकारी नोकरीत असलेले तसेच मेडिकल आणि फार्मास्युटिकल्स या क्षेत्रातील सहभागींमध्ये घरखरेदीची इच्छा तीव्र असल्याचे दिसून आले. हातातील नोकरी आणि आर्थिक स्थैर्यामुळे हे शक्य झाले आहे. 
  • घरासाठी कर्ज घेताना झटपट प्रक्रिया, ग्राहकहिताचे नियम आणि इतर सुविधा यामुळे लोकांचा बँका तसेच बिगरबँक वित्तीय संस्थांवर जादा विश्वास असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र सध्या तेजीत आहे. गेल्या १० वर्षांतील आकडेवारी पाहता सध्या दिसत असलेली तेजी सर्वाधिक आहे. यामुळे विकासक आणि घरखरेदीदार यांच्या कमालीचा विश्वास असल्याचे दिसून येत आहे.सुधीर पै,सीईओ, मॅजिकब्रिक्स

टॅग्स :बांधकाम उद्योगगुंतवणूक