Join us  

Post Office च्या आरडीवर व्याज वाढलं, ₹२०००, ₹३०००, ₹५००० च्या RDवर किती मिळणार रिटर्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 3:09 PM

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये (RD) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात सरकारनं पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. १ ऑक्टोबरपासून नवे दर लागू होतील. आत्तापर्यंत तुम्हाला ५ वर्षांच्या आरडीवर ६.५ टक्के दराने व्याज मिळत होते, पण १ ऑक्टोबरपासून तुम्हाला ६.७ टक्के दराने व्याज मिळेल. सरकारनं त्यात २० बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आता ₹२०००, ₹३००० किंवा ₹ ५००० ची मासिक आरडी सुरू केली, तर तुम्हाला नवीन व्याजदरासह किती परतावा मिळेल हे जाणून घेऊ.

२ हजारांच्या गुंतवणूकीवर किती परतावातुम्ही ५ वर्षांसाठी दरमहा २ हजारांची आरडी सुरू करणार असाल, तर तुम्ही एका वर्षात २४ हजार रुपये आणि ५ वर्षात १,२०,००० गुंतवाल. अशा स्थितीत तुम्हाला नवीन व्याजदरासह म्हणजेच ६.७ टक्के व्याजासह २२,७३२ रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, ५ वर्षांनंतर, तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्रित केली जाईल आणि तुम्हाला एकूण १,४२,७३२ रुपये मिळतील.

३ हजारांच्या गुंतवणूकीवर किती परतावाजर तुम्हाला दरमहा ३ हजारांची आरडी सुरू करायची असेल, तर तुम्ही एका वर्षात ३६,००० आणि ५ वर्षात एकूण १,८०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरांनुसार, तुम्हाला ३४,०९७ रुपये व्याज म्हणून मिळतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,१४,०९७ रुपये मिळतील.

५ हजारांच्या गुंतवणूकीवर किती परतावातुम्ही दरमहा ५ हजारांची आरडी सुरू केल्यास, तुम्ही ५ वर्षांत एकूण ३ लाखांची गुंतवणूक कराल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला ६.७ टक्के दरानं ५६,८३० रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर ३,५६,८३० रुपये मिळतील.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक