Lokmat Money >गुंतवणूक > आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?

आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?

टाटाने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 50 टक्के अधिक नफा मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:31 PM2023-05-03T19:31:32+5:302023-05-03T19:32:09+5:30

टाटाने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 50 टक्के अधिक नफा मिळवला आहे.

Interest is yours and Tata's income ; 734 crore earned in just three months, know how..? | आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?

आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?

अनेक लोकांना महागड्या वस्तू विकत घेण्याची आवड असते. अशावेळी ते पैसा पाहत नाहीत तर ती वस्तू पाहतात. अशी लोक श्रीमंत लोकांच्या वर्गात येतात. कारण, मध्यमवर्गीयांना आपल्या आडीची प्रत्येक वस्तू घेता येत नाही. दरम्यान, याच काही श्रीमंत लोकांच्या आवडीमुळे Tata समूहातील एका कंपनीला मोठा फायदा झाला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 50 टक्क्यांनी वाढला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत टाटा ग्रुपची कंपनी टायटनचा स्टँडअलोन नफा 734 कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच तिमाहीत 491 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हे प्रमाण 50 टक्के अधिक आहे.

घड्याळ, पर्स, बेल्ट, चष्मा, दागिन्यांचा व्यवसाय
टाटा समूह टायटन या ब्रँड नावाने घड्याळांचा व्यवसाय करते. याशिवाय त्यांचा तनिष्क या ब्रँड नावाने दागिन्यांचा, स्किन ब्रँड नावाने परफ्यूम, फास्ट्रॅक या ब्रँड नावाखाली फॅशन अॅक्सेसरीज आणि टायटन आइप्लस या ब्रँड नावाखाली चष्म्यांचा व्यवसाय करते. चौथ्या तिमाहीत कंपनीचे कामकाजातील उत्पन्न 33 टक्क्यांनी वाढून 9,704 कोटी रुपये झाले आहे. 2021-22 च्या याच कालावधीत ते 7,276 कोटी रुपये होते.

शेअरधारकांनाही फायदा 
टायटनच्या शेअर्स होल्डरनाही मोठा नफा झाला आहे. कंपनीने प्रत्येक शेअर होल्डर्सला 10 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. बुधवारी कंपनीच्या शेअरची किंमत 2,651 रुपयांवर बंद झाली.

ज्वेलरी व्यवसायात सर्वाधिक वाढ
टायटनच्या तनिष्क ब्रँड अंतर्गत दागिन्यांचा व्यवसाय या कालावधीत 24 टक्क्यांनी वाढून 7,576 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कंपनीचा भारतातील दागिन्यांचा व्यवसाय 21 टक्क्यांनी वाढला आहे. घड्याळ आणि इतर वेअरेबल्सच्या कंपनीच्या व्यवसायाने एकूण 871 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्नापेक्षा हे 40 टक्के अधिक आहे.

Web Title: Interest is yours and Tata's income ; 734 crore earned in just three months, know how..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.