Join us  

Investment Tips : इतक्या वर्षांसाठी करा ५ हजारांची गुंतवणूक आणि मिळू शकतात १ कोटी, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 2:20 PM

या योजनेत सरकारकडून परताव्याची हमीही दिली जाते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही सर्वात यशस्वी आणि फायदेशीर बचत योजनांपैकी एक आहे. पीपीएफ या योजनेत सरकार परताव्याची हमी देते. आयकरच्या कलम 80C नुसार, PPF खातेधारकाला कर सूट मिळू शकते. तथापि, एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपयांची कमाल सूट मिळेल. गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार्‍या काही सर्वात कमी जोखमीच्या योजनांपैकी पीपीएफ आहे.

सरकार पीपीएफवर 7.1 टक्के व्याज देत आहे. पीपीएफचा व्याजदर सरकारच्या सूचनेनुसार प्रत्येक तिमाहीत बदलू शकतो. म्हणजेच दर तीन महिन्यांनी बचत योजनेवर मिळणारे व्याज सरकार ठरवते. जर आपण त्याच्या मागील ट्रेंडवर नजर टाकली तर, पीपीएफवरील व्याजदर 7.1 टक्के किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे.

असं बनू शकता लखपतीवयाच्या 25 व्या वर्षी, जर तुम्ही PPF मध्ये दरमहा 5000 रुपये गुंतवायला सुरुवात केली तर तुमची वार्षिक गुंतवणूक 60,000 रुपये होईल. तुम्हाला 15 वर्षांत 7.1 टक्के व्याजदराने 7,27,284 रुपये व्याज मिळेल. 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 9,00,000 रुपये असेल. 15 वर्षांची मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्ही 40 वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला 16,27,284 रुपये मिळतील.

पीपीएफ असे बनवेल कोट्यधीशतथापि, तुम्ही ही 5,000 रुपये प्रति महिना गुंतवणूक 37 वर्षे कायम ठेवल्यास, तुम्हाला एकूण 22,20,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 83,27,232 रुपयांचा परतावा मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 1,05,47,232 रुपये मिळतील. आधी सांगितल्याप्रमाणे, PPF ची कमाल मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. जर तुम्हाला ते 37 वर्षांपर्यंत वाढवायचे असेल, तर 15 व्या, 20 व्या, 25 व्या, 30 व्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला फॉर्म 16-H भरावा लागेल. यानंतर तुमच्या पीपीएफ खात्याचे नूतनीकरण केले जाईल.

मिळतायत अनेक फायदेपीपीएफवरील व्याजदर सरकार ठरवते. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तीन प्रकारे कर लाभ मिळतो. पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशावर कर कपातीच्या लाभाव्यतिरिक्त, व्याज आणि मॅच्युरिटीच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूकपैसा