Lokmat Money >गुंतवणूक > SIP मध्ये दर महिन्याला ५ हजार गुंतवून लाखो रुपये मिळवा, वाचा सविस्तर

SIP मध्ये दर महिन्याला ५ हजार गुंतवून लाखो रुपये मिळवा, वाचा सविस्तर

तुम्हाला जर गुंतवणूक करुन कमी वर्षात फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. SIP तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 04:16 PM2022-10-31T16:16:11+5:302022-10-31T16:18:14+5:30

तुम्हाला जर गुंतवणूक करुन कमी वर्षात फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. SIP तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकते.

Invest 5000 every month in SIP and get lakhs of rupees | SIP मध्ये दर महिन्याला ५ हजार गुंतवून लाखो रुपये मिळवा, वाचा सविस्तर

SIP मध्ये दर महिन्याला ५ हजार गुंतवून लाखो रुपये मिळवा, वाचा सविस्तर

सध्या पैशाची बचत करणे हे कठीण झाले आहे. महागाईमुळे येणारा सर्व पगार हा खर्च करण्यातच संपत आहे. त्यामुळे पैशाची बचत होत नाही. त्यामुळे सध्याच्या काळात पैसे वाचवणे म्हणजे कठीण काम झाले आहे. पण पैसे वाचवण्याचा एक पर्याय आहे, या माध्यमातून तुम्ही पैशाची बचत करु शकता. चला जाणू घेऊया. 

तुम्हाला जर गुंतवणूक करुन कमी वर्षात फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. SIP तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकते.सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा गुंतवणुकीचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. हे मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर केले जाऊ शकते. जर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर SIP हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जास्त वर्षाच्या कालावधीमुळे तुम्हाला जास्त फायदे मिळतो.

एसआयपी सुरू ठेवणे महत्वाचे असते. बाजारात अस्थिरता आहे. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ कधी नफ्यात असेल तर कधी तोट्यात असेल, पण तो कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवावा लागेल. SIP मध्ये तुम्ही दर महिन्याला किती पैसे जमा करता याने काही फरक पडत नाही. जर रक्कम कमी असेल पण सातत्य राखले असेल, तर तुम्ही जितका ज्सात कालावधी घ्याल तेवढा जास्त परतावा मिळेल.

How to Retire Early : ४० व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन उर्वरित आयुष्य आनंदानं जगायचंय? फॉलो करा या टीप्स

SIP व्यतिरिक्त, एकरकमी पैसेही जमा करत रहा. जर तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळत असेल, तर त्या पैशाने अतिरिक्त युनिट्स खरेदी करणे फायदेशीर ठरेल. जर मार्केट खाली गेले आणि म्युच्युअल फंडाची नेट अॅसेट व्हॅल्यू कमी झाली, तर संधीचा फायदा घ्या आणि एकरकमी रक्कम गुंतवा. 

देशात महागाई वाढत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी पैशांची गरज भासेल. दरवर्षी तुमची कमाईही वाढते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला दरवर्षी वेतनवाढीचा लाभ मिळतो. दरवर्षी त्याच धर्तीवर एसआयपी टॉप-अप करा. दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवणे अधिक फायदेशीर ठरेल. 

SIP टॉप-अप करण्याचा किती फायदा होतो, समजा तुमचे वय 35 वर्षे आहे आणि तुम्ही सेवानिवृत्तीसाठी SIP सुरू केली आहे. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी दरमहा रु ५००० ची SIP सुरू केली आणि तुम्हाला १२ टक्के परतावा अपेक्षित असेल तर वयाच्या ६० व्या वर्षी तुम्हाला एकूण ९५ लाख रुपये मिळतील. या २५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १५ लाख रुपये असेल. तर तुम्हाला परतावा ८० लाख रुपयांच्या जवळपास असेल आणि तुमचा निव्वळ परतावा ९५ लाख रुपये असेल, त्यामुळे एसआयपी मध्ये मोठा फायदा आहे. 

Web Title: Invest 5000 every month in SIP and get lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.