जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची गरज भागवायची असेल, तर त्तुम्ही जन्मापासूनच मुलांसाठी गुंतवणुकीचे नियोजन सुरू केले पाहिजे. कारण अनेक सरकारी योजनाच्या माध्यमातून तुम्हाला मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची तरतूद करता येऊ शकते. तुम्हीही मुलांसाठी चांगला पर्याय शोधत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस चाइल्ड लाईफ इन्शुरन्समध्ये (बाल विमा योजना) गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्ही दररोज फक्त ६ रुपये गुंतवून तुमच्या मुलाला कोट्यधीश बनवू शकता.
सरकारने बाल जीवन विमा योजना विशेषतः लहान मुलांसाठी सुरू केली आहे. पालक मुलांच्या नावावर बाल विमा योजना खरेदी करू शकतात. तथापि, त्याची नॉमिनी म्हणून मुलांनाच ठेवता येऊ शकते. या योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुलांचा समावेश होतो. ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे पालक त्यांच्या मुलांसाठी ही योजना खरेदी करू शकत नाहीत.
५ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी योजनाया योजनेमध्ये ५ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होतो. यात मासिक, सहा महिने आणि वार्षिक आधारावर प्रीमिअम जमा करता येतो. या योजनेअंतर्गत ६ रुपयांपासून १८ रुपयांपर्यंत प्रीमिअम दररोज जमा केला जाऊ शकतो. मॅच्युरिटीवर १ लाख रुपयांचा सम अश्योर्डचा लाभ दिला जातो.
काय आहे यात?
- या योजनेत केवळ दोन मुलांना लाभ घेता येऊ शकतो.
- गुंतवणूक करत असलेल्या मुलांचं वय ५ ते २० वर्षांदरम्यान असावं.
- पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं वय ४५ वर्षांपेक्षा अधिक असू नये.
- जर मॅच्युरिटीपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत मुलांना प्रीमिअम द्यावा लागणार नाही.
- पॉलीसी पीरिअड संपल्यानंतर मुलांना संपूर्ण रक्कम दिली जाईल.
- या पॉलिसीसोबत लोनचा लाभ घेता येणार नाही.
- ५ वर्षानंतर ही पॉलिसी तुम्ही सरंडर करू शकता.
- १००० रुपयांच्या सम अश्योर्डवर तुम्हाला प्रति वर्ष ४८ रुपये बोनस दिला जाईल.