Join us  

कमी वेळेत मोठा कॉर्पस फंड तयार करण्यासाठी या योजनांत करा गुंतवणूक, या सरकारी स्कीम्स आहेत बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:12 AM

तुम्हाला तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवायची असेल आणि परताव्याची हमी हवी असेल तर या सरकारी योजना उत्तम पर्याय ठरू शकतात.

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अनेक लोक गुंतवणूक करताना दिसतात. तुम्हाला तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवायची असेल आणि परताव्याची हमी हवी असेल तर अल्प बचत योजना हा उत्तम पर्याय आहे. केंद्र सरकार पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे एकूण १२ अल्प बचत योजना चालवते. या योजनांवर गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांहून अधिक व्याजदराचा लाभ मिळतो.

जर तुम्हाला मोठा कॉर्पस फंड तयार करायचा असेल तर तुम्हाला छोटी छोटी बचत करावी लागेल. कोणतीही व्यक्ती अचानक श्रीमंत होत नाही. म्हणूनच तुम्हाला छोट्या बचतीपासून सुरुवात करावी लागेल. गुंतवणुकीला सुरुवात करतानाही आधी अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही अशा अनेक सरकारी अल्प बचत योजना देखील निवडू शकता. लोक परतावा आणि जोखीम यानुसार गुंतवणूक निवडतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा लोकांसाठी नेहमीच पहिला पर्याय राहिला आहे.

पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये, गुंतवणूकदाराला बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळतं. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टीची माहिती करून घेतली पाहिजे की कोणत्या स्कीममध्ये जास्त परतावा मिळत आहे. सरकार गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांपर्यंत परतावा देते. या बचत योजनांमध्ये खात्रीशीर फायदे उपलब्ध आहेत. यासोबतच गुंतवणूकदार त्यांचं करपात्र उत्पन्न कमी करून कर वाचवू शकतात. अल्प बचत योजना गुंतवणूकदारांच्या प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागल्या जातात.

अल्प बचत योजना आणि त्यावरील व्याजदर

  • एका वर्षासाठी टाईम डिपॉजिट स्कीमवर व्याजदर ६.९ टक्के
  • २ वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर ७ टक्के व्याज
  • ५ वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर ६.५ टक्के
  • सेव्हिंग डिपॉझिट स्कीमवर सध्याचा व्यादर ४ टक्के
  • ३ वर्षांच्या टाईम डिपॉझिट स्कीमवर ७ टक्के व्याज
  • ५ वर्षांच्या टाईम डिपॉझिट स्कीमवर ७.५ टक्के व्याज
  • सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम - सध्याचा व्याजदर ८.२ टक्के व्याज
  • मंथली इन्कम अकाऊंट स्कीम - सध्याचा व्याजदर ७.४ टक्के 
  • नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम - सध्याचा व्याजदर ७.७ टक्के
  • पब्लिक प्रोव्हिडेंट फंड - सध्याचा व्याजदर ७.१ टक्के
  • किसन विकास पत्र स्कीम - सध्याचा व्याजदर ७.५ टक्के
  • सुकन्या समृद्धी योजना - सध्याचा व्याजदर ८ टक्के
टॅग्स :गुंतवणूकपैसा