Join us  

एकदाच पैसे गुंतवा, महिन्याला मिळेल १६ हजारांचं पेन्शन; LIC ची सुपरहिट स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 1:01 PM

मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी एलआयसी पॉलिसींवर विश्वास ठेवतात.

LIC Superhit Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) प्रत्येक श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी अनेक आकर्षक पॉलिसी ऑफर करते आणि मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी एलआयसी पॉलिसींवर विश्वास ठेवतात. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शनची सुरक्षा मिळत नाही. अशा स्थितीत सेवानिवृत्तीचं नियोजन अगोदर करणं गरजेचं आहे. रिटायरमेंट कॉर्पस तयार करण्यासाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात एलआयसीच्या प्लॅन अॅन्युइटी प्लॅन LIC जीवन अक्षय पॉलिसीचा (LIC Jeevan Akshay Policy) देखील समावेश आहे. तुम्ही ही योजना निवृत्ती नियोजनासाठी देखील निवडू शकता.

जीवन अक्षय योजना ही एक इमिडिएट अॅन्युइटी प्लॅन आहे. ही एक सिंगल प्रीमिअम  पॉलिसी आहे आणि त्यात एकरकमी रक्कम गुंतवावी लागते. तुम्ही अॅन्युइटी महिन्यातून एकदा, तीन महिन्यांत, वर्षातून दोनदा किंवा वर्षभरात एकदा टाकू शकता. प्लॅन सुरू होताच पेआउट सुरू होते, त्यामुळे तुम्ही तुमचा पेमेंट पर्याय नंतर बदलू शकत नाही.

किती मिळेल पेन्शनया योजनेत तुम्ही जितकी अधिक गुंतवणूक कराल तितकं जास्त पेन्शन मिळेल. तुम्ही किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता आणि तुमचं किमान वय 30 वर्षे असलं पाहिजे. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 28,625 रुपयांचा वार्षिक परतावा मिळेल. यामध्ये 2315 रुपये दरमहा, 6,988 रुपये तिमाही, सहामाही रुपये 14,088 पेन्शन येते.

महिन्याला १६ हजारांचं पेन्शन कसं मिळेल?तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एलआयसी जीवन अक्षय प्लॅनद्वारे दरमहा 16,000 रुपये पेन्शन मिळवायचं असेल, तर तुम्हाला यासाठी 35 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. यासह, तुम्हाला दरमहा 16,479 रुपये, त्रैमासिक रुपये 49,744, सहामाही रुपये 1,00,275 आणि वार्षिक 2,03,700 रुपये पेन्शन मिळेल.

टॅग्स :व्यवसायएलआयसीनिवृत्ती वेतनगुंतवणूक