Join us

LIC सरल पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करा, मिळवा तब्बल ५० हजारांचं पेन्शन; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 2:16 PM

पॉलिसीधारकांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळानं अनेक योजना सुरू केल्या आहेत.

पॉलिसीधारकांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक सुरक्षा देतात. अशीच एक योजना म्हणजे LIC सरल पेन्शन योजना. पॉलिसीधारकानं एकरकमी पैसे भरल्यानंतर उपलब्ध २ पर्यायांमधून वार्षिक प्रकार निवडण्याचा पर्याय आहे. पॉलिसीच्या प्रारंभापासून वार्षिकी दरांची हमी दिली जाते.

एलआयसीची सरल पेन्शन योजना ही एकल प्रीमियम पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर प्रीमियम एकदा भरावा लागतो. यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास, सिंगल प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. सरल पेन्शन योजना ही एक तत्काळ वार्षिकी योजना आहे, म्हणजेच तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरू होते, तेवढीच रक्कम आयुष्यभर मिळते.

पात्रतेचे निकषया योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा ४०वर्षे आणि कमाल ८० वर्षे आहे.या पॉलिसीमध्ये आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो.पॉलिसी सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.तुमच्याकडे दरमहा किमान १००० रुपये पेन्शन मिळण्याचा पर्याय आहे.

किती पेन्शन मिळेल?या पेन्शन योजनेत तुम्हाला किमान १००० रुपये पेन्शन मिळू शकते. तुमचं वय ४० वर्षे आहे आणि तुम्ही १० लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा केला आहे, त्यानंतर तुम्हाला वार्षिक ५०२५० रुपये मिळू लागतील जे आयुष्यभर उपलब्ध असतील. याशिवाय, जर तुम्हाला तुमची जमा केलेली रक्कम या दरम्यान परत हवी असेल, तर अशा परिस्थितीत ५ टक्के वजा करुन तुम्हाला जमा केलेली रक्कम परत मिळते.

कर्ज सुविधेचाही लाभएलआयसीच्या या पेन्शन योजनेवर तुम्ही कर्जाचा लाभही घेऊ शकता. तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर तुम्ही त्याच्या उपचारासाठी पैसेही घेऊ शकता. या पेन्शन योजनेसोबत तुम्हाला गंभीर आजारांची यादीही दिली जाते. पॉलिसी सरेंडर केल्यावर, मूळ किमतीच्या ९५ टक्के रक्कम परत मिळतात. योजना सुरू केल्यानंतर ६ महिन्यांनंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूकनिवृत्ती वेतन