Join us

Post Office मध्ये एकदा पैसे गुंतवा, दर महिन्याला होईल जबरदस्त कमाई; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:16 AM

Post Office Scheme: ही अशी स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला उत्पन्नाची हमी दिली जाते.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करून दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळवायचे असेल तर एक उत्तम स्कीम आहे. पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त स्कीम म्हणजे मंथली इन्कम स्कीम ( Post Office MIS). ही अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील, यानंतर दर महिन्याला तुम्हाला उत्पन्नाची हमी दिली जाते. बाजारातील चढ-उतारांचा या योजनेतील तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होत नाही. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. एमआयएस खात्यात एकदाच गुंतवणूक करावी लागेल. या स्कीमचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे.

१००० रुपयांत उघडू शकता खातंपोस्ट ऑफिसच्या या योजनेत १००० रुपयांपासून खातं उघडता येतं. यामध्ये तुम्ही सिंगल आणि जॉईंट अशी दोन्ही खाती उघडू शकता. सिंगल अकाऊंटमध्ये ९ लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटमध्ये १५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसनुसार, खाते उघडल्यापासून ते मॅच्युरिटी होईपर्यंत एक महिना पूर्ण झाल्यापासून एमआयएसमध्ये व्याजाचं पेमेंट दर महिन्याला केलं जातं. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. १ जुलै २०२३ पासून या योजनेवर ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.

५ वर्षांपूर्वी काढू शकता पैसेपोट ऑफिस एमआयएसचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांची आहे. ही स्कीम यापूर्वीही बंद करू शकता. परंतु आपण ठेवीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढू शकता. नियमांनुसार, एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेव रकमेतील २ टक्के रक्कम कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल. तुम्ही खाते उघडल्यानंतर ३ वर्षांच्या मुदतीपूर्वी पैसे काढल्यास तुमच्या ठेवीपैकी १ टक्के रक्कम कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल.

POMIS मध्ये कसा मिळतो रिटर्नया योजनेत, तुम्हाला एक निश्चित रक्कम एकदाच जमा करावी लागेल आणि त्यातून तुम्हाला दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात कमाई होत राहते. ही स्कीम ५ वर्षांत मॅच्युअर होते, त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात. म्हणजेच, एकदा पैसे गुंतवून, तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते आणि नंतर योजनेच्या मुदतीनंतर, तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे परत मिळतात. मुदतपूर्तीनंतर, तुम्ही योजनेमध्येच संपूर्ण निधी पुन्हा गुंतवू शकता. जर मॅच्युरिटीवर योजनेतून पैसे काढले किंवा पुन्हा गुंतवले गेले नाहीत, तर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याज दरानुसार संपूर्ण रकमेवर व्याज मिळत राहतं.

टॅक्सचा नियम कायपोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर TDS (tax deducted at source) कापला जात नाही, परंतु तुमच्या हातात मिळणारे व्याज करपात्र आहे.

स्कीम कॅलक्युलेटरआता जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये किती गुंतवणूक करायला हवी तर तुम्ही याचं कॅलक्युलेशन करू शकता. यासाठी, तुम्ही किती रक्कम गुंतवणार हे पाहावं लागेल आणि ७.४ टक्के (वर्तमान व्याज दर) नुसार दरमहा तुम्हाला व्याज मिळेल.

५ लाखांवर किती रिटर्नजर तुम्ही या स्कीममध्ये ७.४ टक्के व्याजदरानं ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला दर महिन्याला ३,०८४ रुपये व्याजापोटी मिळतील. तुम्हाला एकूण व्याजापोटी १,८५,००० रुपये मिळतील. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक