Lokmat Money >गुंतवणूक > संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास; परदेशी गुंतवणुकीत 45% वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक...

संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास; परदेशी गुंतवणुकीत 45% वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक...

Investment in India: एप्रिल-सप्टेंबर 2024 मध्ये भारतातील परदेशी गुंतवणूक US$ 29.79 अब्जावर पोहोचली, ज्यापैकी एकट्या महाराष्ट्रात US$ 13.55 अब्ज गुंतवणूक झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 02:28 PM2024-12-02T14:28:56+5:302024-12-02T14:29:07+5:30

Investment in India: एप्रिल-सप्टेंबर 2024 मध्ये भारतातील परदेशी गुंतवणूक US$ 29.79 अब्जावर पोहोचली, ज्यापैकी एकट्या महाराष्ट्रात US$ 13.55 अब्ज गुंतवणूक झाली आहे.

Investment in India: World Trust in India; 45% increase in foreign investment, highest investment in Maharashtra | संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास; परदेशी गुंतवणुकीत 45% वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक...

संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास; परदेशी गुंतवणुकीत 45% वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक...

Investment in India:भारतातील विदेशी गुंतवणूक (FDI) एप्रिल-सप्टेंबर 2024 मध्ये 45 टक्क्यांनी वाढून US$ 29.79 अब्ज झाली आहे. ही वाढ सर्व्हिस, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, टेलिकॉम, फार्मा अँड केमिकल...यांसारख्या क्षेत्रातील मजबूत गुंतवणूकीमुळे झाली आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) द्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच कालावधीत FDI इनफ्लो US $ 20.5 बिलियन होता. म्हणजेच, यंदा यामध्ये सूमारे दहा अब्जाची वाढ झाली आहे.

जुलै-सप्टेंबरमध्ये 43% वाढ
जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीत एफडीआय प्रवाह 43 टक्क्यांनी वाढून US$ 13.6 अब्ज झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा US$ 9.52 अब्ज होता. तर, एप्रिल-जून तिमाहीतही एफडीआयमध्ये 47.8 टक्क्यांनी वाढ झाली असून, हा आकडा US$ 16.17 अब्जांवर पोहोचला आहे.

एकूण एफडीआयमध्ये 28% वाढ
एकूण एफडीआय (ज्यामध्ये इक्विटी इनफ्लो, पुनर्गुंतवणूक आणि इतर भांडवलाचा समावेश आहे) पहिल्या सहामाहीत 28 टक्क्यांनी वाढून US$ 42.1 अब्ज झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा US$ 33.12 अब्ज होता.

'या' देशांनी भारतात मोठी गुंतवणूक केली
भारतात गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, नेदरलँड्स आणि यूएई सारख्या नावांचा समावेश आहे. मॉरिशसमधून  US$ 5.34 अब्जाची गुंतवणूक झाली, जी मागील वर्षी  US$ 2.95 अब्ज होती. तर, सिंगापूरमधून  US$ 7.53 अब्जाची गुंतवणूक आली, जी यापूर्वी  US$ 5.22 अब्ज होती, तर अमेरिकेतून  US$ 2.57 अब्जाची गुंतवणूक झाली, जी गेल्या वर्षी  US$ 2 अब्ज होती. याशिवाय, UAE मधून सर्वाधिक  US$ 3.47 अब्ज गुंतवणूक झाली, जी गेल्यावर्षी  US$ 1.1 अब्ज होती. 

'या' क्षेत्रांमध्ये गुंतवणूक
गुंतवणुकीच्या क्षेत्रानुसार पाहिल्यास, सेवा, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, दूरसंचार, फार्मा आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. सेवा क्षेत्रातील एफडीआय पहिल्या सहामाहीत US $ 5.69 बिलियनवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत US $ 3.85 बिलियन होता. तर, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात US$ 2 बिलियन गुंतवले गेले.

राज्यांनुसार महाराष्ट्र अव्वल 
राज्य पातळीवर महाराष्ट्रात सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक आली. येथे 13.55 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. त्यापाठोपाठ कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणाचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये सुमारे 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. यानंतर कर्नाटक आहे. येथे 3.54 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. तेलंगणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 1.54 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली.

Web Title: Investment in India: World Trust in India; 45% increase in foreign investment, highest investment in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.