आपण कोट्यधीश व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्हीही मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल, नोकरी करत असाल आणि भविष्यात तुम्हाला कोट्यधीश बनायचं असेल तर हे स्वप्न एसआयपीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीद्वारे करावी लागते. एसआयपी हे मार्केट लिंक्ड असले तरी, बहुतेक तज्ज्ञ हा आजच्या काळात गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानतात.तुम्ही एसआयपीमध्ये जितकी जास्त वेळ गुंतवणूक कराल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत, तुमचे गुंतवलेले पैसे दीर्घकाळात वेगानं वाढतात. एसआयपीचा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. हा परतावा आजच्या कोणत्याही स्कीमपेक्षा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, दीर्घकाळ एसआयपीमध्ये गुंतवणूक करत राहून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.5000 च्या गुंतवणूकीनं किती वर्ष लागणारसमजा, आजपासून तुम्ही 5000 रुपयांची SIP सुरू केली, तर तुम्ही ती 26 वर्षे सतत सुरू ठेवा. 12 टक्के रिटर्ननुसार, तुम्हाला 26 वर्षांत 1,07,55,560 रुपये मिळतील. तर 5000 रुपये दरमहाच्या हिशोबानं तुमची एकूण गुंतवणूक 15,60,000 रुपये असेल.
8000 च्या गुंतवणूकीवर किती वर्ष लागणारजर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम थोडी वाढवली आणि 8000 रुपये दरमहा गुंतवले तर कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला किमान 22 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. 22 वर्षात तुम्ही एकूण 21,12,000 रुपये गुंतवाल, परंतु 12 टक्के रिटर्ननुसार तुम्हाला 1,03,67,167 रुपये मिळतील.
10000 च्या गुंतवणूकीवर किती वर्ष लागतीलजर तुमचा पगार चांगला असेल आणि तुम्ही दरमहा 10,000 रुपये गुंतवू शकत असाल, तर तुम्ही तुमचं कोट्यधीश होण्याचं स्वप्न लवकर पूर्ण करू शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला 20 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही 20 वर्षांत 24,00,000 रुपये गुंतवाल, परंतु तुम्हाला 12 टक्के परतावा म्हणून 99,91,479 रुपये (सुमारे 1 कोटी रुपये) मिळतील. जर तुम्ही ते 21 वर्षे चालू ठेवले तर तुम्हाला परतावा म्हणून 1,13,86,742 रुपये मिळू शकतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)