Investment in Startup: चित्रपट उद्योग असो की खेळाचं मैदान, यातील दिग्गज मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याच्या इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहेत. मगमहेंद्रसिंग धोनीपासून विराट कोहलीपर्यंत असो, किंवा आमिर खान आणि रणबीर कपूर असो. अलीकडेच आमिर आणि रणबीरने एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. या फिल्म स्टार्सशिवाय, इतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचा मोठा पैसा DroneAcharya नावाच्या वेगाने वाढणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवला आहे.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार अलीकडील ब्रह्मास्त्र चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता रणबीर कपूर आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी प्री-आयपीओ राऊंडमध्ये ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडमध्ये (DroneAcharya Ariel Innovations Ltd.) गुंतवणूक केली आहे. या कंपनीने अलीकडेच SME IPO साठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे.
या दिग्गजांचीही गुंतवणूक
कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार आमिर खान आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त, ज्या दिग्गजांनी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्समध्ये भागभांडवल विकत घेतले आहे त्यात मार्केटमधील दिग्गज शंकर शर्मा आणि ITC ई-चौपाल आणि बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशन इंडियासोबत यापूर्वी कार्यरत असलेल्या मंजिना श्रीनिवास यांचे नाव आहे.
नवीसुरुवात
महाराष्ट्रातील पुणे येथे मुख्यालय असलेली ही कंपनी BSE SME एक्सचेंजमध्ये सूचिबद्ध होण्यासाठी संधी शोधत असलेली भारतातील पहिले एकात्मिक ड्रोन इकोसिस्टम स्टार्ट-अप आहे. ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशनचे संस्थापक आणि एमडी प्रतीक श्रीवास्तव म्हणाले, “देशातील ड्रोन इकोसिस्टमची नोंदणी करून भविष्यात पुढील स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट असलेले भारतातील पहिले ड्रोन स्टार्ट-अप असल्याचा आम्हाला अभिमान आहे. 40 हून अधिक लोकांची टीम असल्याने, आम्ही आता 2.0 व्हिजन ऑफ ग्रोथ आणि व्हॅल्यू क्रिएशन लाँच करणार आहोत.”
कायकरतेकंपनी?
DroneAcharya Aerial ही संपूर्णपणे विकसित केलेली इनोव्हेटिव्ह डेटा सोल्यूशन्स कंपनी आहे, जी मल्टी-सेन्सर ड्रोन सर्वेक्षण, मजबूत उच्च-कॉन्फिगरेशन हार्डवेअर, ड्रोन डेटा प्रोसेसिंग आणि ड्रोन वितरणासाठी ड्रोन इन-द-बॉक्स सोल्यूशनसाठी संपूर्ण इकोसिस्टम प्रदान करते. ड्रोन आचार्य बुक-बिल्डिंग रुटवारे प्रत्येकी 10 रुपयांचे 62.90 लाख इक्विटी शेअर्स ऑफर करण्याची योजना आखत आहेत. शेअर्स BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर (BSE SME) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.