Join us

NPS चे पैसे मिळवणं झालं सोपं; भरावा लागेल केवळ एक फॉर्म, जाणून घ्या नवे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 1:05 PM

पाहा काय करण्यात आलेत बदल.

आता तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) म्हणजेच NPS चे पैसे मिळणे सोपे झाले आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आणि पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने NPS सदस्यांना एन्युटी जारी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यास सहमती दर्शविली आहे. आता हे केवळ एक विड्रॉव्हल फॉर्म (withdrawal form) फॉर्म वापरून केले जाऊ शकते. याचा अर्थ एनपीएस सदस्यांना एन्युटी निवडण्यासाठी वेगळा प्रस्ताव फॉर्म भरावा लागणार नाही. IRDAI ने एका परिपत्रकाद्वारे एन्युटी प्रोडक्ट्ससाठी ही घोषणा केली आहे.

सध्याची प्रक्रिया काय?सध्या NPS पेन्शनधारकांना पैसे काढताना PFRDA कडे 'तपशीलवार' एक्झिट फॉर्म सबमिट करावा लागतो. एकदा त्यांनी त्यांच्या पसंतीच्या एन्युटी योजनेचा निर्णय घेतला की, त्यांनी विमा कंपन्यांनी प्रदान केलेला प्रस्ताव फॉर्म पूर्णपणे भरला पाहिजे. 14 नोव्हेंबर 2022 रोजीच्या PFRDA परिपत्रकानुसार, दोन आर्थिक नियामकांच्या एकत्रित कृतीमुळे त्याचे सदस्य आणि भागधारकांना मिळणारे फायदे अनेक पटींनी वाढले आहेत.

हे फायदे मिळणार

  • एन्युटी मिळवणे सोपे झाले आहे आणि जारी करण्यास कमी वेळ लागेल.
  • एकरकमी पेमेंट आणि एन्युटी जारी करण्याची समांतर प्रक्रिया.
  • ग्राहक निवृत्त झाल्यानंतर ताबडतोब एन्युटीद्वारे सेवानिवृत्तीच्या उत्पन्नाचा भरणा आणि सेवानिवृत्तासाठी नियमित उत्पन्न सुनिश्चित करणे.
  • सोपे ओल्ड एज इन्कम सपोर्ट.
  • संबंधित स्टेक होल्डर्ससाठी काम करणे सोपे. 

कुठे अपलोड होणार फॉर्म14 नोव्हेंबर 2022 च्या PFRDA परिपत्रकानुसार, एक्झिटची विनंती करताना KYC सह सर्व आवश्यक कागदपत्रांसह एक पूर्णपणे भरलेला एक्झिट फॉर्म संबंधित CRA प्रणालीवर अपलोड करावा लागेल.

टॅग्स :निवृत्ती वेतनगुंतवणूक