Lokmat Money >गुंतवणूक > सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूकीची संधी, RBI ३ सेटमध्ये करणार ३४००० कोटींच्या बॉन्ड्सची विक्री, डिटेल्स

सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूकीची संधी, RBI ३ सेटमध्ये करणार ३४००० कोटींच्या बॉन्ड्सची विक्री, डिटेल्स

हा लिलाव तीन सेटमध्ये होणार असल्याचं अर्थ मंत्रालयाने सांगितलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:08 AM2024-01-02T11:08:02+5:302024-01-02T11:08:19+5:30

हा लिलाव तीन सेटमध्ये होणार असल्याचं अर्थ मंत्रालयाने सांगितलं.

Investment opportunity in government bonds RBI will sell 34000 crore bonds in 3 sets check details | सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूकीची संधी, RBI ३ सेटमध्ये करणार ३४००० कोटींच्या बॉन्ड्सची विक्री, डिटेल्स

सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूकीची संधी, RBI ३ सेटमध्ये करणार ३४००० कोटींच्या बॉन्ड्सची विक्री, डिटेल्स

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) शुक्रवारी, ५ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या लिलावाच्या माध्यमातून ३४,००० कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड्सच्या विक्रीची घोषणा अर्थ मंत्रालयाने सोमवारी केली. हा लिलाव तीन सेटमध्ये होणार असल्याचं अर्थ मंत्रालयाने सांगितलं.

तीन सेटमध्ये लिलाव

  • पहिला सेट: १२ हजार कोटींच्या (नाममात्र) अधिसूचित रकमेसाठी “७.३२ टक्के सरकारी सिक्युरिटीज २०३०”.
  • दुसरा सेट: १० हजार कोटींच्या (नाममात्र) अधिसूचित रकमेसाठी “७.१८ टक्के सरकारी सिक्युरिटीज २०३७”.
  • तिसरा सेट: एकाधिक मूल्य पद्धती वापरून मूल्य आधारित लिलावाद्वारे अधिसूचित रकमेसाठी “७.२५ टक्के सरकारी सिक्युरिटीज २०६३”
     

सरकारकडे प्रत्येक सुरक्षेसाठी २ हजार कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त सदस्यता कायम ठेवण्याचा पर्याय असेल. सरकारी बॉन्ड्सच्या लिलावामध्ये गैर-स्पर्धात्मक बोली सुविधा योजनेनुसार सिक्युरिटीजच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या ५ टक्क्यांपर्यंत पात्र व्यक्ती आणि संस्थांना वाटप केलं जाईल.

लिलावासाठी स्पर्धात्मक आणि गैर-स्पर्धात्मक अशा दोन्ही बोली ५ जानेवारी रोजी आरबीआय कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर केल्या पाहिजे. नॉन कॉम्पिटिटीव्ह बोली सकाळी १०:३० ते ११ दरम्यान आणि स्पर्धात्मक बोली सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत सादर कराव्यात लागणार आहेत. लिलावाचा निकाल ५ जानेवारी रोजी घोषित केला जाईल आणि यशस्वी बोलीदारांना ८ जानेवारी रोजी पैसे भरावे लागतील.

Web Title: Investment opportunity in government bonds RBI will sell 34000 crore bonds in 3 sets check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.