Join us  

आजपासून Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओमध्ये गुंतवणूकीची संधी, पाहा ५ महत्त्वाच्या बाबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:22 AM

इक्विटी मार्केटमध्ये आजकाल बरीच हालचाल पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनाही मोठा नफा मिळतोय

Utkarsh Small Finance Bank IPO: इक्विटी मार्केटमध्ये आजकाल बरीच हालचाल पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनाही मोठा नफा मिळतोय. याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे आयडियाफोर्ज टेक (ideaforge Tech) आणि Cyient DLM चं लिस्टिंग. आता 12 जुलैपासून आणखी एक IPO उघडला आहे. याचं नाव उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक असं असून यामध्ये प्रति शेअर २३-२५ रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

इश्यू साइज: ५०० कोटी रुपयेलॉट साइज: ६०० शेअर्सप्राइस बँड: २३-२५ ​​रुपये प्रति शेअरआयपीओ उघडण्याची तारीख: १२ जुलैबंद होण्याची तारीख: १४ जुलै

हे लक्षात ठेवा

  • किमान गुंतवणूक: डीआरएचपी फाइलिंगनुसार, पब्लिक ऑफरिंगमध्ये प्राईज बँड २३ ते २५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये तुम्हाला ६०० शेअर्स मिळतील. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी बोली लावावी लागते. यासाठी १५००० रुपयांची किमान गुंतवणूक करावी लागेल. 
  • कमाल गुंतवणूक: किरकोळ गुंतवणूकदार IPO मध्ये जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकतात. यासाठी १९५००० रुपये भरावे लागतील. 
  • लिस्टिंग तारीख: हा आयपीओ १२ जुलै ते १४ जुलै दरम्यान खुला असेल. शेअर्सचं वाटप १९ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. तर २४ जुलै रोजी बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट केले जाऊ शकतात. 
  • नवीन इश्यू: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आयपीओमध्ये फक्त नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. या अंतर्गत २० कोटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. 
  • IPO मध्ये रिझर्व्हेशन: आयपीओमध्ये QIB साठी ७५ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा राखून ठेवला जाईल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के शेअर्स राखीव असतील. तसंच, १५ टक्के हिस्सा एनआयआयसाठी राखीव असेल. 
  • बँकेचा व्यवसाय: वाराणसी स्थित उत्कर्ष एसएफबीची सुरुवात २०१६ मध्ये सुरू झाली. आर्थिक वर्ष २०१९ आणि आर्थिक वर्ष २०२० मध्ये ५०० कोटी रुपयांच्या AUM सह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगाने वाढणारा SFB राहीला आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक