Join us  

दररोज फक्त 10 रुपये वाचवून होईल 45 लाख रुपयांचा फंड! मोबाइलवरुनच सुरू करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:42 AM

Investment Tips : सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही दररोज 10 रुपये वाचवले आणि गुंतवणूक केली तरी देखील तब्बल 45 लाख रुपयांचा फंड तयार करू शकत

Investment Tips : आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणे फार आवश्यक आहे. माझ्याकडे कुठे आहेत एवढे पैसे? असं म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्षित करतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर तुम्हाला एका गोष्टीची आठवण करुन देणे गरजेचे आहे. 'थेंबेथेंबे तळे साचे' अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. गुंतवणूक योग्य ठिकाणी असेल तर हजार नाही तर काही रूपये देखील तुम्हाला श्रीमंत करू शकता. अगदी दररोज 10 रुपये गुंतवणून तुम्ही लखपती व्हाल.

10 रुपयांत लखपती होण्यावर तुमचा विश्वास बसत नसेल ना? तर हा पूर्ण लेख वाचल्यानंतर तुम्हीही लगेच गुंतवणुकीला सुरुवात कराल. तुमचे हे स्वप्न सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे सत्यात उतरू शकते. SIP द्वारे तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा लाभ मिळतो. दीर्घ मुदतीत तुमच्या छोट्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

300 रुपयांची SIP सुरू कराचला आता प्लॅन समजून घेऊ. जर तुम्ही दररोज 10 रुपये वाचवले तर महिन्याला 300 रुपये SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवली, तर तुम्ही पुढील 30 वर्षांत 45 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. येथे तुम्हाला सरासरी 15 टक्के वार्षिक परताव्यासह 45 लाख रुपयांचा निधी जमा करता येईल. यामध्ये तुमची गुंतवणूक फक्त 5 लाख 92 हजार रुपये इतकीच असेल. म्युच्युअल फंड एसआयपीवर 15 टक्के परतावा ही फक्त सरासरी आहे. बाजारात असे अनेक फंड योजना आहेत, जे दीर्घ मुदतीत तुम्हाला लखपती नाही तर करोडपती करतील.

SIP म्हणजे काय रे भावड्या?म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे SIP. याला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असंही म्हतात. याद्वारे तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. एसआयपी हे अगदी बँकेच्या आरडीसारखे आहे. परंतु, येथे तुम्हाला बँकेपेक्षा चांगले रिटर्न्स मिळतात. दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ठराविक वेळेत एक निश्चित रक्कम कापली जाते आणि SIP मध्ये गुंतवली जाते.

(Disclaimer - लेखात म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूक