Join us  

Investment Tips: कोट्यधीश बनायचंय तर ही ट्रिक समजून घ्या, दररोज करावी लागेल केवळ ५० रूपयांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 4:01 PM

Investment Tips: जर तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीचा योग्य मार्ग माहित असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

जर तुम्हाला कोट्यधीश व्हायचं असेल आणि तुमचं उत्पन्न जास्त नसेल तर काळजी करू नका. जर तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीचा योग्य मार्ग माहित असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कमाई करण्यापेक्षा बचत करणं आणि बचत योग्य ठिकाणी गुंतवणं महत्त्वाचं आहे. श्रीमंत लोक बचत आणि गुंतवणुकीच्या या पद्धतींचा अवलंब करतात. अशाप्रकारे, ते अल्पावधीतच आपली बँक शिल्लक अनेक पटींनी वाढवतात. आज आपण अशाच ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत. हे फॉलो करून तुम्हीही अल्पावधीत श्रीमंतांच्या यादीत सामील होऊ शकता.

दिवसाला ५० रुपये वाचवातुमचा विश्वास बसणार नाही, पण जर तुम्ही दररोज ५० रुपये वाचवले तर तुम्ही सहज कोट्यधीश होऊ शकता. त्यासाठी फक्त नियोजन महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दररोज ५० रुपये वाचवले तर महिन्याभरात तुमचे १५०० रुपये वाचतील. आता ही बचत तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवावी लागेल. गुंतवणुकीच्या धोरणानुसार म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय असेल. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची वेळ खूप महत्त्वाची असते.

तयार होईल १ कोटींचा फंडगुंतवणुकीसाठी सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन. या सूत्रानं संपत्ती झपाट्यानं वाढवता येते. तुमचं वय २५ वर्षे असल्यास आणि तुम्ही दररोज ५० रुपये वाचवत असाल, तर तुम्ही ते SIP द्वारे गुंतवू शकता. दररोज ५० रुपये वाचवले म्हणजे तुमची दरमहा १५०० रुपयांची बचत होईल. म्युच्युअल फंड सरासरी १२ ते १५ टक्के परतावा देतात. समजा तुम्हाला १२.५ टक्के परतावा मिळाला. या प्रकरणात, तुम्ही समान व्याजदरानं ३५ वर्षे गुंतवणूक केल्यास, तुमची सुमारे १.२६ कोटी रुपयांची बँक शिल्लक तयार होईल.

रिटायरमेंटच्या वेळी मोठा फंडअशा प्रकारे गुंतवणूक केल्यानं, निवृत्तीच्या वयात तुम्हाला बऱ्यापैकी बँक बॅलन्स मिळेल. जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षापासून अशा प्रकारे गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी ३० वर्षांपर्यंत येईल. गुंतवणुकीच्या या सूत्राचा अवलंब करून तुम्ही तुमचा बँक बॅलन्स अगदी सहज वाढवू शकता. निवृत्तीनंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

टॅग्स :गुंतवणूकपैसा