Join us

Investment Tips : महिन्याला गुंतवा केवळ ₹५०००, मिटेल मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 4:48 PM

मुलांशी संबंधित खर्चाची चिंता टाळण्याचा मार्ग म्हणजे मूल जन्माला येताच गुंतवणूक सुरू करणे. अशा ठिकाणीही गुंतवणूक करावी जिथून परतावाही चांगला मिळतो.

मुलाच्या जन्मानंतर पालकांच्या जबाबदाऱ्याही वाढतात. मुलांची चांगली काळजी घेण्याबरोबरच, त्याच्या/तिच्या उच्च शिक्षणाची आणि लग्नाचीही काळजी वाटू लागते. मुलांशी संबंधित खर्चाची चिंता टाळण्याचा मार्ग म्हणजे मूल जन्माला येताच गुंतवणूक सुरू करणे. अशा ठिकाणीही गुंतवणूक करावी जिथून परतावाही चांगला मिळतो. आम्ही तुम्हाला अशा गुंतवणुकीच्या मार्गाबद्दल सांगत आहोत जिथे तुमच्या मुलांच्या जन्मानंतरच गुंतवणुकीला सुरुवात केली तर तुमचं मूल 21 वर्षांचं होईपर्यंत तुम्ही 57 लाख रुपये जोडू शकता. या रकमेतून तुम्ही तुमच्या मुलाचं उच्च शिक्षण सहज करून घेऊ शकता आणि त्यांच्या लग्नाचाही खर्च करू शकता. 

जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी पैसे वाचवायचे असतील तर त्यांचा जन्म होताच SIP सुरू करा. यासाठी तुम्हाला किमान 5000 रुपयांची एसआयपी सुरू करावी लागेल. ही SIP किमान 21 वर्षे सतत चालू ठेवावी लागेल. SIP मध्ये सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. कधीकधी परतावा यापेक्षाही जास्त असतो. दीर्घकालीन एसआयपीमुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी जोडू शकता. 

57 लाख रुपये मिळतील 

जर तुम्ही 21 वर्षांपर्यंत मुलाच्या नावावर 5000 रुपयांची एसआयपी चालवली तर तुम्ही एकूण 12,60,000 रुपये गुंतवाल, परंतु 21 वर्षांत 12 टक्के दरानं तुम्हाला 44,33,371 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशाप्रकारे, 21 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 56,93,371 रुपये म्हणजेच सुमारे 57 लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला या योजनेवर 15 टक्के परतावा मिळत असेल, तर 21 वर्षांत 12,60,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के दराने 76,03,364 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे यात, तुम्हाला एकूण 88,63,364 रुपये मिळतील.  

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

टॅग्स :गुंतवणूक