Join us

Investment Tips : जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 9:42 AM

How to make your Child Crorepati: प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्हाला फायदा मिळेल.

How to make your Child Crorepati: प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्हाला फायदा मिळेल. जर तुम्ही चांगल्या स्ट्रॅटेजीनं गुंतवणुकीला सुरुवात केली तर तुम्ही मुलाचं वय १८ पूर्ण होताच त्याच्यासाठी १ कोटी रुपयांचा मोठा निधी तयार करू शकता. या वयात करिअरलाही अतिशय महत्त्व असतं. अशा वेळी आर्थिक पाठबळ भक्कम असेल तर त्याला उच्च शिक्षण किंवा पुढे नवा व्यवसाय सुरू करणं खूप सोपं जाऊ शकतं.

मुलांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. पण इथं असं पाहावं लागेल की अशी दीर्घकालीन गुंतवणूक योजना निवडा, ज्यात कंपाउंडिंगचा प्रचंड फायदा होतो आणि उद्दिष्टानुसार कॉर्पसही सहज तयार करता येईल. १८ वर्षे हा मोठा काळ आहे आणि म्युच्युअल फंड एसआयपी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारात अनेक म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यामध्ये दीर्घकालीन एसआयपीचा परतावा १५% अॅन्युअल किंवा त्यापेक्षा जास्त आहे. आपण या संदर्भात १८x१५x१० नियम वापरू शकता.

१८x१५x१० नियम समजून घ्या

जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी एसआयपीसाठी तयार असाल आणि मूल १८ वर्षांचं झाल्यावर १ कोटी फंड तयार करण्याचं ध्येय ठेवत असाल तर म्युच्युअल फंडात १८x१५x१० ही रणनीती उपयुक्त ठरू शकते. या नियमाचा अर्थ असा की, १८ वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये एसआयपीच्या माध्यमातून अशा योजनांमध्ये गुंतवावे, ज्यात वार्षिक १५ टक्के दरानं व्याज मिळू शकतं.

कसं असेल कॅलक्युलेशन?

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही १८ वर्षे दरमहा १० हजार रुपयांची मासिक एसआयपी करत असाल आणि त्यावर अंदाजित परतावा वार्षिक १५ टक्के असेल तर १८ वर्षांनंतर तुमच्याकडे १.१० कोटी रुपयांचा फंड असेल. या काळात तुमची एकूण गुंतवणूक २१.६० लाख रुपये असेल. मात्र, अंदाजित परतावा सुमारे ८८.८ लाख रुपये असेल.

एसआयपी: कंपाउंडिंगची ताकद

१८x१५x१० नियमाचा मुख्य उद्देश कंपाउंडिंगच्या शक्तीचा वापर करणं हा आहे. गुंतवणूक जितकी जास्त असेल तितका त्यात कंपाउंडिंगचा फायदा जास्त होतो. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणं फायद्याचं ठरतं. १८x१५x१० च्या स्ट्रॅटेजीमध्ये कंपाउंडिंगची ताकद समजून घ्या, जर तुम्ही १० वर्षांसाठी एसआयपी केली तर मॅच्युरिटीवर २७,८६,५७३ रुपयांचा फंड तयार होईल, तर १५ वर्षात हा कॉर्पस ६७,६८,६३१ रुपये होऊ शकतो. तर १८ वर्षांनंतर तुमच्याकडे अंदाजे १.१ कोटींचा निधी असेल. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून आहे. यात परताव्याची शाश्वती नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा