Best Investment Schemes for Daughters: दरवर्षी २४ जानेवारी रोजी नॅशनल गर्ल चाईल्ड डे साजरा केला जातो. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं आणि समाजातील मुलींबद्दलचा भेदभाव दूर करून त्यांना सक्षम करणं हा यामागचा उद्देश आहे. बुधवारी २४ जानेवारीला नॅशनल गर्ल चाईल्ड डे साजरा करण्यात आला. जर तुम्हीही मुलीचे वडील असाल तर आजच तुमच्या मुलीच्या नावावर अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमची मुलगी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. अशाच काही योजनांबद्दल आपण आज जाणून घेऊ.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yajana)
जर मुलींसाठी चालवल्या जाणार्या योजनांबद्दल बोलायचं झालं तर सुकन्या समृद्धी योजनेचा नक्कीच उल्लेख होतो. ही योजना भारत सरकार विशेषतः मुलींसाठी चालवते. या योजनेत १५ वर्षे सातत्यानं गुंतवणूक करावी लागते आणि २१ वर्षांनी ही योजना मॅच्युअर होते. ज्या पालकांच्या मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वर्षाला जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सध्या त्यावर ८.२ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. तुम्ही सध्याच्या व्याजदरानुसार गणना केल्यास, तुम्ही वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर तुमच्या मुलीला ६९,२७,५७८ रुपये मिळतील. जर तुम्ही दरमहा ५ हजार रुपये म्हणजेच वार्षिक ६० हजार रुपये गुंतवले तर २१ वर्षांनंतर तुमच्या मुलीला २७,७१,०३१ रुपये मिळतील.
महिला सम्मान बचत पत्र (Mahila Samman Savings Certificate)
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलींसाठी, त्यांचे पालक खातं उघडू शकतात. ही एक डिपॉझिट स्कीम आहे ज्यामध्ये ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. योजना दोन वर्षांनी मॅच्युअर होते. अशा स्थितीत उत्तम व्याजही मिळतं आणि नफाही होतो. जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दोन वर्षांनी २,३२,०४४ रुपये मिळू शकतात.
पब्लिक प्रोविडेंट फंड (Public Provident Fund)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक योजना आहे ज्यामध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. जर तुमची मुलगी अल्पवयीन असेल, तर पालक तिच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ७.१ टक्के दरानं व्याज मिळतं. या योजनेतही वर्षाला जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना १५ वर्षांनी मॅच्युअर होते.
तुम्ही इच्छित असल्यास, तुम्ही ही स्कीम ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवल्यास, १५ वर्षांनंतर तुमच्या मुलीला ४०,६८,२०९ रुपयांची मालक होईल. जर ५ वर्षांसाठी कालावधी वाढवल्यास २० वर्षांनी तुमची मुलगी ६६,५८,२८८ रुपयांची मालक होईल.
Investment Tips : 'या' स्कीम्स तुमच्या मुलीला नक्कीच बनवतील लखपती, भविष्यासाठी आहे उत्तम योजना
जर तुम्हीही मुलीचे वडील असाल तर आजच तुमच्या मुलीच्या नावावर अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमची मुलगी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:50 AM2024-01-25T11:50:53+5:302024-01-25T11:55:22+5:30