Lokmat Money >गुंतवणूक > थेंबे थेंब तळे साचे; वाचणारे पैसे 'इथे' गुंतवा, मुलाच्या/मुलीच्या लग्नापर्यंत पुरेल पैसा!

थेंबे थेंब तळे साचे; वाचणारे पैसे 'इथे' गुंतवा, मुलाच्या/मुलीच्या लग्नापर्यंत पुरेल पैसा!

गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय तपासून बघा. चांगला परतावा मिळतोय, एवढंच पाहणं पुरेसं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 11:53 PM2022-08-14T23:53:46+5:302022-08-14T23:54:07+5:30

गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय तपासून बघा. चांगला परतावा मिळतोय, एवढंच पाहणं पुरेसं नाही.

Investment Tips: some government schemes are beneficial for financial needs after retirement | थेंबे थेंब तळे साचे; वाचणारे पैसे 'इथे' गुंतवा, मुलाच्या/मुलीच्या लग्नापर्यंत पुरेल पैसा!

थेंबे थेंब तळे साचे; वाचणारे पैसे 'इथे' गुंतवा, मुलाच्या/मुलीच्या लग्नापर्यंत पुरेल पैसा!

आयुष्यात नुसते पैसे कमावणं उपयोगाचं नाही, तर गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडण सर्वात महत्त्वाचं असतं. कारण, एका विशिष्ट वयानंतर शरीर थकतं आणि उत्पन्नाचे मार्ग बंद होत जातात. अशा वेळी ही गुंतवणूकच आपल्याला आधार देते. मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सर्व निधी कसा तयार करावा यासाठी काही टीप्स..

गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय तपासून बघा. चांगला परतावा मिळतोय, एवढंच पाहणं पुरेसं नाही. त्या गुंतवणुकीतील जोखीमही लक्षात घेतली पाहिजे. जर गुंतवणूक गरजेनुसार असेल तर ध्येय गाठणे सोपे जाईल.

कुठे करू शकता गुंतवणूक?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना या तीन सरकारी योजना आपल्याला मोठा आधार देऊ शकतात. आपली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी लाभदायक ठरू शकतात. आपल्याला भविष्यात नेमके कधी आणि किती पैसे लागणार आहेत, याचा अंदाज घेऊन आपण या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. 

भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)

या योजनेंतर्गत वार्षिक ७.१% व्याज दिले जाते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही १ कोटींहून अधिकचा फंड सहज तयार करू शकता. यात तुम्हाला मिळणारे रिटर्न पूर्णपणे करमुक्त आहेत. 

>> ₹५०० किमान रक्कम गुंतवणूक  
>> कमाल गुंतवणूक १.५ लाख प्रतिवर्ष
>> पीपीएफ खात्यातील पैसे १५ वर्षांनंतर काढता येतात. यात २५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता
>> तुम्ही तुमचे पैसे १५, २० किंवा २५ वर्षांनी काढू शकता

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएसई) 

या योजनेत वार्षिक ६.८% परतावा मिळतो. यात केलेल्या गुंतवणुकीला कलम ८० सी. अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.  

>> ₹१००० रुपये किमान गुंतवणूक आवश्यक 
>> कमाल रक्कम कितीही गुंतवू शकता. मर्यादा नाही.
>> लॉक ईन कालावधी ५ वर्षांचा.
>> या योजनेत मुलांच्या नावानेही खाते उघडता येते.

सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय)  

सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक ७.६% व्याज आहे. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी अतिशय चांगली सरकारी योजना.   

>> ₹२५० किमान गुंतवणूक 
>> तुम्ही यामध्ये ० ते १० वर्षांच्या मुलीच्या नावावर ती १४ वर्षांची होईपर्यंत गुंतवणूक करू शकता. 
>> मुलगी २१ वर्षांची झाल्यावर व्याजासह एकरकमी रक्कम मिळेल.
>> हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते.
 

Web Title: Investment Tips: some government schemes are beneficial for financial needs after retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.