Lokmat Money >गुंतवणूक > Investment Tips : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, 'या' ३ ठिकाणची गुंतवणूक येईल कामी

Investment Tips : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, 'या' ३ ठिकाणची गुंतवणूक येईल कामी

आता नवीन वर्ष सुरू झालंय. आर्थिक नियोजन करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:23 PM2024-01-02T14:23:20+5:302024-01-02T14:25:08+5:30

आता नवीन वर्ष सुरू झालंय. आर्थिक नियोजन करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

Investment Tips these government schemes safe retirement in the new year ppf vpf elss | Investment Tips : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, 'या' ३ ठिकाणची गुंतवणूक येईल कामी

Investment Tips : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, 'या' ३ ठिकाणची गुंतवणूक येईल कामी

Retirement fund : आता नवीन वर्ष सुरू झालंय. आर्थिक नियोजन करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आता तुमचं वय ३०-४० असेल तर तुम्ही निवृत्तीचं नियोजन करून ठेवावं. अनेक सॅलराइड प्रोफेशनल्स त्यांच्या आर्थिक नियोजनात निवृत्तीचं नियोजन टार्गेट म्हणून ठेवत नाहीत. पण या वर्षी तुम्ही एक गोष्ट दुरुस्त करू शकता. तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती निधीसाठी दीर्घकालीन गुंतवणूक आणि धोरण अवलंबल्यास, गुंतवणुकीसाठी अनेक चांगले पर्याय आहेत. या पर्यायांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. वॉलेंटरी प्रोविडेंट फंड (VPF), ईएलएसएस (ELSS) किंवा पब्लिक प्रोविडेंट फंडमध्ये (PPF) गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो.

वॉलेंटरी प्रोविडेंट फंड (VPF) - ईपीएफमध्ये मूळ वेतनाच्या केवळ 12 टक्के रकमेचं योगदान देता येतं. परंतु, VPF (Voluntary Provident Fund) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. याचा अर्थ, जर कर्मचार्‍यानं आपला पगार कमी ठेवून भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान वाढवले, तर या पर्यायाला व्हीपीएफ म्हणतात. VPF मध्ये देखील EPF प्रमाणे 8.15 टक्के व्याज दिले जात आहे. ही योजना ईपीएफचा विस्तार आहे. केवळ नोकरी करणाऱ्यांनाच याचा लाभ घेता येऊ शकतो. बेसिक सॅलरी आणि डीएच्या (Dearness allowance) 100 टक्के यात गुंतवता येते.

यासाठी काय करावं लागेल?
तुम्हाला तुमच्या कंपनीच्या HR किंवा फायनान्स टीमशी संपर्क साधावा लागेल. व्हीपीएफमध्ये योगदानाची विनंती करावी लागेल. प्रोसेस झाल्यानंतर, VPF तुमच्या EPF खात्याशी लिंक केला जाईल. व्हीपीएफचे वेगळे खाते उघडले जात नाही. VPF योगदान दरवर्षी सुधारित केले जाऊ शकते. दरम्यान, कंपनी VPF मध्ये गुंतवणूक करण्यास बांधील नाही. कर्मचारी फक्त त्याचं योगदान वाढवू शकतो.

काय आहेत खास बाबी?
तुम्ही नोकरी बदलल्यास, तुम्ही हे खातं सहजपणे ट्रान्सफर करू शकता. यावर कर्जही उपलब्ध आहे. मुलांचं शिक्षण, गृहकर्ज आणि मुलांच्या लग्नासाठीही कर्ज घेता येतं. VPF खात्यातून अंशतः रक्कम काढण्यासाठी खातेदारानं 5 वर्षे काम करणं आवश्यक आहे. जर ते 5 वर्षांपेक्षा कमी असेल तर टॅक्स कापला जातो. व्हीपीएफची संपूर्ण रक्कम निवृत्तीनंतरच काढता येते. याला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो. गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर (EEE) मिळणारे पैसे पूर्णपणे करमुक्त असतात.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ELSS) - देशात 42 म्युच्युअल फंड कंपन्या टॅक्स सेव्हिंग्स स्कीम्स चालवतात. आयकर वाचवण्यासाठी प्रत्येक कंपनीकडे ELSS असते. हे ऑनलाइन किंवा एजंटकडून खरेदी केले जाऊ शकते. आयकर वाचवण्यासाठी, एकवेळ गुंतवणुकीची मर्यादा किमान 5 हजार रुपये आहे आणि जर तुम्हाला दरमहा गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दरमहा किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळू शकते, परंतु जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) - सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही उघडली जाऊ शकते. कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील ट्रान्सफर केले जाऊ शकते. ते उघडण्यासाठी फक्त 500 रुपये पुरेसे आहेत. दरवर्षी एकावेळी 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. ही योजना 15 वर्षांसाठी आहे, त्यामुळे या दरम्यान पैसे काढता येत नाहीत. परंतु, 15 वर्षांनंतर ते 5-5 वर्षांसाठी या योजनेचा कालावधी वाढवता येतो.

Web Title: Investment Tips these government schemes safe retirement in the new year ppf vpf elss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.